ICC World Cup 2019 : सेमीफायनलमध्ये मिळाला प्रवेश आणि भारतीय संघाची भटकंती चालू!

सेमिफायनलामध्ये प्रवेश केल्याने भारतीय संघाला थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र ट्रेनिंगला दांडी मारत पुढील सामन्यापूर्वी भारतीय संघ लीड्स च्या रस्त्यांवर फिरताना दिसत.

News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2019 03:16 PM IST

ICC World Cup 2019 : सेमीफायनलमध्ये मिळाला प्रवेश आणि भारतीय संघाची भटकंती चालू!

ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघानं शानदान कामगिरी केली आहे. बांगलादेशला नमवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेल्या भारतीय संघाचा आता लीग स्टेजमधील एक सामना शिल्लक आहे. सेमिफायनलामध्ये प्रवेश केल्याने भारतीय संघाला थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र ट्रेनिंगला दांडी मारत पुढील सामन्यापूर्वी भारतीय संघ लीड्सच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहेच.

भारतीय संघाने मिळालेल्या वेळाचा उपयोग करत, आपल्या टीममेटसोबत वेळ घालवला. या फोटोंना चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. तर, धोनीच्या अनोख्या ‘स्वॅग’ ची चर्चा होत आहे. धोनीसोबत हार्दि‌क पांड‍्या, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मयंक अग्रवाल ही मंडळीही फिरताना दिसले. इन्स्टाग्रामवर याचा फोटो हार्दि‌क पांड‍्याने शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, “बॉइज डे आऊट”.

तर दुसरीकडे भारतीय संघाचा कप्तान विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत फिरत आहे. सामन्यापूर्वी ते दोघं एन्जॉय करताना दिसले. विराटने इन्स्टाग्रामवर अनुष्कासोबतचा फोटो शेअर करत “मिस्टर एंड मिसेस” असं कॅप्शन दिलं.

इन्स्टाग्रामवर चहलचा वेगळा स्वॅग पाहायला मिळाला. एखाद्या अॅडच्या शूटसारखी पोझ त्याने दिली आहे.

शिखर धवनला दुखापत झाल्य़ानंतर सामऱ्यातून बाहेर पडल्यानंतर एन्ट्री झाली ती ऋषभ पंतची. तो ही फिरतानाचे आणि मस्ती करतानाचे फोटो, स्टोरीज शेअर करत असतो.

Loading...

युजवेंद्र चहल त्याच्या आई- वडिलांसोबत फिरायला गेला असून त्यांच्यासोबतचा फोटोही शेअर केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 03:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...