World Cup : भारत नाही तर 'हा' संघ जिंकू शकतो वर्ल्ड कप, सेहवागनं केली भविष्यवाणी

World Cup : भारत नाही तर 'हा' संघ जिंकू शकतो वर्ल्ड कप, सेहवागनं केली भविष्यवाणी

इंग्लंडनं आतापर्यंत पाच सामन्यात 4 सामने जिंकले आहेत तर, केवळ एका सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे.

  • Share this:

लंडन, 21 जून : ICC Cricket World Cupमध्ये विराटच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सध्या विजयीपथावर आहे. भारतानं आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, यातील तीन सामन्यात विजय तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला. मात्र भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागनं भारत वर्ल्ड कप जिंकू शकत नाही, अशी भविष्यवाणी केली नाही आहे. याची कारणंही त्यानं सांगितली आहे. शोएब अख्तरच्या यु-ट्युब चॅनलवर सेहवागनं वर्ल्ड कपच्या सामन्यांचे विश्लेषण केले आहे.

वर्ल्ड कपमध्ये सेहवागनं इंग्लंड हा आपला आवडता संघ असल्याचे जाहीर केले आहे. याचे कारण म्हणजे, "इंग्लंडकडे 1-2 नाही तर तब्बल 11 फलंदाज आहे. सात गोलंदाज आहेत. त्यामुळं त्यांचा संघ फक्त कागदावर नाही तर, मैदानावरही शेर आहे. त्यामुळं जर, भारताला त्यांच्या विरोधात जिंकायचे असेल तर, त्यांना आपला सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे". सेहवागनं, "भारत-इंग्लंड यांच्यात चांगले आहे, हे सेमीफायनलमध्ये कळेल", असेही म्हणाला.

आता नाही तर, कधीच नाही

इंग्लंडबाबत सेहवागनं, "त्यांनी आता वर्ल्ड कप जिंकला नाही तर कधीच नाही जिंकू शकत. इंग्लंडचा संपूर्ण संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कर्णधार इयॉन मॉर्गनचा फॉर्म संघासाठी महत्त्वाचा आहे", असे मत व्यक्त केले.

इंग्लंडचा आतापर्यंत एकच पराभव

इंग्लंडनं आतापर्यंत पाच सामन्यात 4 सामने जिंकले आहेत तर, केवळ एका सामन्यात पराभव मिळाला आहे. पाकिस्तान विरोधात त्यांना पराभव स्विकारावा लागला. कर्णधार मॉर्गन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यानं अफगाणिस्तान विरोधात एतिहासिक कामगिरी केली होती. 148 धावांची खेळी मॉर्गननं केली होती.

वाचा- विराटसाठी आनंदाची बातमी, वर्ल्ड कप गाजवणारा अष्टपैलू खेळाडू फिट

वाचा- वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या विराटसेनेचं रुप पालटलं, PHOTO व्हायरल

वाचा- ...म्हणून पाक संघानं ऐकला नाही PM इमरान यांचा सल्ला

सानियासाठी 'रावळपिंडी एक्स्प्रेस' उतरली मैदानात, ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2019 11:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading