World Cup : भारत-पाक लढतीबाबत विराट असं काही म्हणाला, की सर्फराजची बोलती झाली बंद

World Cup : भारत-पाक लढतीबाबत विराट असं काही म्हणाला, की सर्फराजची बोलती झाली बंद

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जूनला सामना होणार आहे.

  • Share this:

लंडन, 23 मे : विश्वचषकाला केवळ सात दिवसांचा कालावधी उरला असताना, या स्पर्धेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. 30मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये विश्वचषकाला सुरुवात होत आहे. दरम्यान भारताचा पहिला सामना 5 जूनला साऊथ आफ्रिकेविरोधात होणार आहे. असे असले तरी, सर्वांचे लक्ष लागले आहे ते, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे.

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील सामना हा हायवोल्टेज सामना मानला जात असला तरी, चाहत्यांसाठी हे द्वंद्व युध्द असते. या दोन्ही देशांमध्ये आपसिक संबंध चांगले नसल्यामुळं त्याचा परिणाम भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात दिसतो. दरम्यान, आयसीसी स्पर्धेच्या निमित्ताने हे दोन कट्टर शेजारी क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांसमोर येतात आणि त्यामुळेच उभय संघांतील सामन्याची दोन्ही देशांतील चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.

दरम्यान, विश्वचषकस्पर्धेआधी आयसीसीनं आयोजिक केलेल्या पत्रकार परिषदेत सर्व संघातील कर्णधारांनी सहभाग घेतला होता. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला, पाकिस्तान सोबत होणाऱ्या सामन्याबद्दल विचारले असता, त्यानं, ''मी याआधीही याबाबत मत व्यक्त केले आहे. हा सामना आमच्याकरिता इतर सामन्याप्रमाणेच आहे. त्यामुळे त्याबाबत अधिक विचार करण्याची गरज नाही. आम्ही सर्वच व्यावसायिक खेळाडू आहोत आणि सर्वांना त्यांच्या जबाबदारीची माहित आहेत. सर्व संघ आणि खेळाडू विजयासाठी मैदानात उतरतात. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मैदानावर तणावाचे वातावरण असते, हे मान्य करायला हवं.'', असे मत व्यक्त केलं.त्यानंतर सर्फराजनं यावर मान डोलावली. मात्र तो थोडा घाबरलेला दिसला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जूनला सामना होणार आहे.

असे असतील भारताचे सामने

5 जून : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका (दु. 3 वाजता)

9 जून : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिय (दु. 3 वाजता)

13 जून : भारत विरुद्ध न्युझीलॅंड (दु. 3 वाजता)

16 जून : भारत विरुद्ध पाकिस्तान (दु. 3 वाजता)

22 जून : भारत विरुद्ध अफगाणिस्तान (दु. 3 वाजता)

27 जून : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (दु. 3 वाजता)

30 जून : भारत विरुद्ध इंग्लंड (दु. 3 वाजता)

2 जुलै : भारत विरुद्ध बांगलादेश (दु. 3 वाजता)

6 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (दु. 3 वाजता)

2019 च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक

पाकिस्तानचा संघ : सरफराज अहमद, बाबर आज़म, फ़खर ज़मान, इमाम उल हक, हैरिस सोहेल, आसिफ अली, मोहम्मद हफीज, इमाद वसीम, हसन अली, शाहीन शाह अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद हसनैन, शादाब खान, शोएब मलिक, वहाब रियाज.


वाचा- 'या' दोन देशातील युद्धामुळे पहिल्या क्रिकेट वर्ल्ड कपला उशिर

वाचा- World Cup : भारताचा हा 'कच्चा दुवा' ठरणार डोकेदुखी?

वाचा-World Cup : 1 ट्रॉफी, 46 दिवस, 10 संघ...या दिवशी असतील भारताचे सामने

VIDEO : रश्मी ठाकरेंनी भरवला उद्धवना विजयाचा पेढा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 08:25 PM IST

ताज्या बातम्या