world cup: सेमीफायनलचे 'ते' 3 संघ कोणते? भारतासह 6 संघात टशन! ICC World Cup 2019 | india vs west indies

world cup: सेमीफायनलचे 'ते' 3 संघ कोणते? भारतासह 6 संघात टशन!  ICC World Cup 2019 | india vs west indies

वर्ल्डकपमधील काही अनेपेक्षित विजय आणि पराभवाने सेमीफायनलसाठीची चुरस आणखी वाढली आहे.

  • Share this:

मँचेस्टर, 27 जून: ICC world cup 2019मध्ये सेमीफायनलचे सामने जवळ येत आहेत. स्पर्धेत सुरुवातीला सेमीफायनलची स्पर्धा सहज वाटली होती. पण काही अनेपेक्षित विजय आणि पराभवाने सेमीफायनलचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. पाकिस्तानच्या संघाने सुरुवातीच्या लढतीत निराश कामगिरी केली पण नंतर त्यांनी सलग दोन विजय मिळवत सर्वांना धक्का दिला. आता पाकिस्तानचा संघही सेमीफायनलच्या स्पर्धेत आला आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडसारखा संघ जो पहिल्या सामन्यापासून दमदार कामगिरी करत आहे त्यांच्यावर मात्र स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. बाद गटात एकट्या ऑस्ट्रेलियाने 12 गुणांसह स्थान पक्क केले आहे. न्यूझीलंड 11 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जाणून घेऊयात सेमीफायनलसाठी कोणत्या 6 संघांमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

... तर पाकिस्तान पोहोचेल सेमीफायनलमध्ये

वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचे दोन सामने शिल्लक आहेत. यातील एक सामना अफगाणिस्तान आणि दुसरा बांगलादेश विरुद्ध आहे. पाकिस्तानने जर हे दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे 11 गुण होतील. पण केवळ या दोन विजयामुळे त्यांना सेमीफायनलमध्ये जागा मिळणार नाही. तर इंग्लंडने त्यांच्या शिल्लक सामन्यांपैकी केवळ एकात विजय मिळवाला आणि श्रीलंकेचा किमान एका सामन्यात पराभव व्हावा यासाठी पाकिस्तानला प्रार्थना करावी लागेल.

या अटीसह इंग्लंड सेमीफायनलमध्ये पोहोचणार

यजमान इंग्लंडने 7 पैकी 3 सामन्यात पराभव स्विकारला आहे. त्यांच्याकडे 8 गुण आहेत. जर इंग्लंडने त्यांचे शिल्लक दोन्ही सामने हारले तर ते स्पर्धेतून बाहेर होतील. अशा परिस्थितीत श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान या संघांना चौथा नंबर मिळू शकते. जर इंग्लंडने एका सामन्याच विजय मिळवला तर त्यांचे 10 गुण होतील. पण जर त्यांनी दोन्ही सामने (न्यूझीलंड आणि भारत) जिंकले तर त्यांचे 12 गुण होतील आणि चांगल्या रनरेटच्या जोरावर ते सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करतील.

बांगलादेशसाठी सेमीफायनलामध्ये पोहोचण्याचे मार्ग

बांगलादेशने 7 सामन्यात 7 गुण मिळवले आहेत. बांगलादेशचे शिल्लक दोन शिल्लक आहेत. त्यापैकी एक सामना पाकिस्तानशी तर दुसरा भारताविरुद्ध आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी बांगलादेशला दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागेल. असे झाले तर त्यांचे 11 गुण होतील. पण तरी बांगलादेश सेमीफायनलमध्ये पोहोचणार नाही. त्यासाठी इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या तिन्ही संघांना त्यांच्या शिल्लक सामन्यातील प्रत्येकी एका सामन्यात पराभव स्विकारावा लागेल.

न्यूझीलंडसाठी असा असेल प्रवास सेमीफायनलचा...

सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी न्यूझीलंडला केवळ 1 विजय हवा आहे. एका विजयाने 13 गुण होतील. न्यूझीलंडचे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्याविरुद्धचे सामने शिल्लक आहेत. न्यूझीलंडचा जर दोन्ही सामन्यात पराभव झाला आणि त्याच वेळी इंग्लंडने भारताचा पराभव केला तर न्यूझीलंडची सेमीची वाट बिकट होईल.

काय आहे भारतासाठीची अट

भारताचे वर्ल्डकमध्ये केवळ 5 सामने खेळले आहेत. यातील 4 मध्ये भारताने विजय मिळवला आहे. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला 4 पैकी 2 सामन्यात विजय अवश्यक आहे. पण जर भारताचा 3 सामन्यात पराभव झाला तर त्यांचे 11 गुण होतील. अशा परिस्थितीच भारताच्या सेमीफायनलमध्ये जाण्याच्या अडचणी वाढतील.

सीन 1- भारताने शिल्लक 4 ही सामन्यात विजय मिळवला तर 17 गुणांसह ते गुणतक्त्यात टॉपवर जातील

सीन 2- श्रीलंका आणि इंग्लंड वगळता अन्य दोन सामन्यात विजय मिळवल्यास भारताचे 12 गुण होतील. तर एक सामना जिंकल्यास भारताचे 11 गुण होती. ही स्थिती भारतासाठी धोकादायक ठरू शकते.

सीन 3- पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी त्यांचे शिल्लक दोन्ही सामने जिंकले व भारताने त्याच्या 4 पैकी एका सामन्यात विजय मिळवला तरी रनरेटच्या जोरावर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये स्थान पक्क करु शकतो.

विदर्भ-मराठवाड्यात पावसाची दांडी, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First published: June 27, 2019, 2:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading