News18 Lokmat

World Cup : न्युझीलंडचा 'हा' खेळाडू म्हणतो, भारताला हरवणं कठीण नाही !

भारत आणि न्युझीलंड यांच्यात 25 मे रोजी सराव सामना होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 01:58 PM IST

World Cup : न्युझीलंडचा 'हा' खेळाडू म्हणतो, भारताला हरवणं कठीण नाही !

लंडन, 22 मे : क्रिकेटच्या विश्वातील सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणजे आयसीसी वर्ल्ड कप. या विश्वचषकासाठी आता केवळ आठ दिवसांचा कालावधी उरला असताना, सर्व संघ सराव सामन्यासाठी सज्ज झाले आहे. प्रत्येक संघ विश्वचषक जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. दरम्यान विश्वचषकाकरिता भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. 30मेपासून सुरु होणाऱ्या या रणसंग्रामात भारताचा पहिला सामना 5 जूनला साऊथ आफ्रिकेविरोधात होणार आहे. मात्र त्याआधी विराटसेना सराव सामने खेळतील. यातील पहिला सराव सामना न्युझीलंड विरोधात होणार आहे.

दरम्यान न्युझीलंडच्या दिग्गज गोलंदाज रॉस टेलर यानं, भारत विरोधात सराव सामना खुप महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच, भारत हा प्रबळ दावेदार असला तरी त्यांना आम्ही सराव सामन्यात पराभूत करु शकतो, असा विश्वासही टेलरनं व्यक्त केला. भारत आणि न्युझीलंड यांच्यात 25 मे रोजी सराव सामना होणार आहे. आयसीसीशी बोलताना रॉसनं, भारत सर्वात शक्तीशाली संघ आहे, मात्र त्या संघाची मदार काही ठरवीक खेळाडूंवर आहे, त्यामुळं त्यांना पराभूत करणं कठिण नाही.

राऊंड रॉबीन फॉरमॅटचा फायदा होणार

यंदाचा विश्वचषक हा राऊंड रॉबीन पध्दतीने खेळा जाणार आहे. यात सर्व संघांना आपल्या प्रतिस्पर्धी संघाशी एक सामना खेळणं बंधनकारक असणार आहे. यानंतर जे संघ टॉप चारमध्ये असतील ते संघ सेमीफायनलमध्ये पोहचतील. याआधी विराटनं या फॉरमॅटमुळं चिंता वाढल्या असल्याचे मत व्यक्त केलं होतं. मात्र रॉस टेलरनं या पध्दतीचा फायदा होणार असल्याचे मत व्यक्त केलं आहे.

काय आहे राऊंड रॉबीन फॉरमॅट ?

Loading...

27 वर्षांनी राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्घतीने संघ एकमेकांसोबत खेळतील. यामुळे स्पर्धेत मोठी रंगत येणार आहे. मात्र, यामुळे टॉपच्या संघांसाठी ही धोक्याची घंटा असण्याची शक्यता आहे. राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाची एकमेकांशी लढत होते. यात कोणत्याही संघाला कमी किंवा जास्त करता येत नाही. प्रत्येक संघाला त्यांची ताकद अजमावण्याची संधी मिळते. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान या संघांना दावेदार मानलं जात आहे. मात्र, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघही टॉप 4 मध्ये पोहचू शकतात. 1992 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत या पद्धतीने सामने झाले होते.

वाचा- World Cup : पाकिस्तानचा सामना कसा करणार? विराटनं दिलं हे उत्तर

वाचा- World Cup : महिलेसोबत गैरवर्तन, कॉमेंटेटरला विमानातून उतरवलं

वाचा- World Cup : भारताचा हा 'कच्चा दुवा' ठरणार डोकेदुखी?

वाचा - World Cup : ‘या’ खेळाडूमुळं वर्ल्ड कपआधी पाकिस्तान संघातील वाद चव्हाट्यावर



VIDEO : आमदाराच्या हत्येनंतर मोठा उद्रेक, रस्त्यावर उतरून लोकांकडून निषेध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2019 01:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...