ऑलिम्पिकमध्ये होणार क्रिकेटचा समावेश, ICCनं सांगितली 'ही' डेडलाईन!

क्रिकेट वर्ल्ड कप आणि टेस्ट चॅम्पियनशीपनंतर आता आयसीसी एक मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2019 05:19 PM IST

ऑलिम्पिकमध्ये होणार क्रिकेटचा समावेश, ICCनं सांगितली 'ही' डेडलाईन!

दुबई, 13 ऑगस्ट : क्रिकेट वर्ल्ड कप आणि टेस्ट चॅम्पियनशीपनंतर आता आयसीसी एक मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. आयसीसीच्या वतीनं 2028मध्ये होत असलेल्या लॉस एंजिलेस येथील ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होणार आहे. मेरिलबोन क्रिकेट क्लब या समितीचे संचालक माईक गॅटिंग यांनी, “आयसीसी 2028मध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत”, असे सांगितले.

गॅटिंग यांनी लॉर्ड्समध्ये झालेल्या मुलाखतीत आयसीसीच्या मुख्य अधिकाऱ्यांनीही याबाबत माहिती दिली. इएसपीएन क्रिकइन्फोनं दिलेल्या माहितीनुसार आयसीसीचे मुख्य अधिकारी आणि गॅटिंग यांच्यात लवकरच याबबात चर्चा होणार आहे. त्यानंतर क्रिकेटला 2028मध्ये ऑलिम्पिकमध्ये जागा मिळणार की नाही, हे ठरणार आहे. त्यामुळं जर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला तर, ही मोठी बातमी असणार आहे. याआधी 9 ऑगस्ट रोजी भारताचे क्रेंद्रिय क्रीडा सचिन राधेश्याम जुलानिया यांनी बीसीसीआयने नाडामध्ये यावे, असे सांगितले होते. दरम्यान बीसीसीआयनं हा निर्णय मान्य केला होता, याचेही गॅटिंग यांनी स्वागत केले.

वाचा-भारताला वर्ल्ड चॅम्पियन करणारे गॅरी कर्स्टन आता होणार 'या' संघाचे कोच!

राष्ट्रकुल स्पर्धेत तब्बल 24 वर्षांनी असणार क्रिकेट

नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार महिला क्रिकेटला 2022मध्ये बर्मिंगहॅमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत शामिल करण्याचा निर्णय घेतला आहे. माइक गॅटिंग यांनी याबाबत सांगितले. येत्या दोन-तीन दिवसात याबाबत सांगण्यात येणार आहेत. मात्र, महिला क्रिकेटला संधी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही सांगितेल. जर, राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटला शामिल करण्यात आले तर, 1998नंतर पहिल्यांदा क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे.

Loading...

वाचा-भारताचं 'ऐश्वर्य'! मोटरस्पोर्ट्समध्ये वर्ल्ड कप जिंकणारी देशातील पहिलीच महिला

वाचा-श्रेयस अय्यर बनला 'टारझन', शेअर केला खतरनाक स्टंटचा व्हिडिओ

VIDEO : भाजपच्या नगरसेविकेची गुंडगिरी, पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या मराठा संघाच्या कार्यकर्त्यांना मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 05:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...