S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

#INDvENG ICC Women's World T20 : महिला टीमचं बॅडलक, सगळे सामने जिंकून सेमीफायनलमध्ये पराभूत

या पराभवामुळे भारताचे आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे.

Updated On: Nov 23, 2018 08:48 AM IST

#INDvENG ICC Women's World T20 : महिला टीमचं बॅडलक, सगळे सामने जिंकून सेमीफायनलमध्ये पराभूत

23 नोव्हेंबर : 23 नोव्हेंबर : आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपमध्ये सलग सामने जिंकणाऱ्या भारतीय महिला टीमसाठी आजचा दिवस वाईट ठरला. सेमीफायनल सामन्यात इंग्लंडने ८ विकेट्स राखून भारताचा पराभव केला. या पराभवामुळे भारताचे आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीची जोडी तानिया भाटीया आणि स्मृती मंधानाने चांगली सुरुवात करून दिली. पण ६ व्या षटकात स्मृती मंधाना ३४ धावा करून बाद झाली. स्मृतीने २३ चेंडूत ४ षटकार आणि १ चौकार लगावला होता. त्यानंतर आलेल्या जेमिहा रोड्रिगेज आणि तानियाने धावफलक उंचावण्याचा प्रयत्न केला परंतु, ९ षटकात तानिया ११ धावा करून बाद झाली.


भारताची सलामी जोडी माघारी परतल्यानंतर मैदानात कर्णधार हरमनप्रीत कौर आली. पण हरमनप्रीत आणि जेमिहाची जोडी फार काळ मैदानात तग धरू शकली नाही. १४ व्या षटकात जेमिहा २६ धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेली वेदा कृष्णामूर्ती अवघ्या २ धावा करून बाद झाली तिच्यापाठोपाठ हरमनप्रीतही त्याच षटकात १६ धावा करून बाद झाली. त्यानंतर भारतीय टीमचा कोणताही खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही. 19.3 षटकात भारत सर्वबाद ११२ धावा करू शकला. इंग्लंडकडून कर्णधार हीथर नाईट हीने सर्वाधिक ३ तर सोफी एक्केलस्टोनने २ विकेट्स मिळवल्या.


११२ धावांचं माफक आव्हान इंग्लंड टीमने सहज पार केलं. पण सलामीची जोडी टॅमी बायुमोंट १ तर डेनियल हेजल ८ धावा करून झटपट बाद झाले. पण त्यानंतर आलेल्या एमी जोंस आणि नताली स्क्राइवर यांनी इंग्लंड टीमला विजय मिळवून दिला. एमीने ५३ तर नतालीने नाबाद ५२ धावा करून टीमला अंतिम सामन्यात पोहोचवले.भारत २०१० नंतर पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. भारताला इतिहास रचण्याची संधी होती. मात्र, महिला टीमच्या प्रयत्नांना यश आले नाही.
==================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 23, 2018 08:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close