वचपा काढला !, भारतीय महिला सेनेनं पाकचा उडवला धुव्वा

वचपा काढला !, भारतीय महिला सेनेनं पाकचा उडवला धुव्वा

एकता बिष्टने फक्त आठ रन्स देऊन पाच विकेट घेत टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला.

  • Share this:

02 जुलै : चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये पाकिस्तानाकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढत टीम महिला इंडियाने पाकला चांगलीच धुळ चारली आहे. भारताने पाकचा 95 रन्सने धुवा उडवला. एकता बिष्टने फक्त आठ रन्स देऊन पाच विकेट घेत टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला.

महिला वर्ल्ड चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये आज भारत आणि पाकिस्तान महिला संघ आमनेसामने आले. भारताने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची सुरुवात खराब राहिली. भारताची धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधाना अवघे 2 रन्स करून आऊट झाली. त्यानंतर कॅप्टन मिताली राजही 8 रन्स करून आऊट झाली. त्यामुळे भारत पूर्ण 50 ओव्हर्स खेळणार नाही की  अशी अवस्था झाली. पण झूलन गोस्वामी आणि सुषमा वर्माने शेवटपर्यंत झुंज देत स्कोअर 150 पार नेला. पूनम राऊतने सर्वाधिक 47 रन्स केले. तर सुषमा 33, झूलन 14 आणि दीप्ती शर्माने 28 रन्स केले. भारताने 169 रन्स करत पाकसमोर 170 रन्सचे आव्हान दिले.

170 रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या पाक टीमची सुरुवात खराब झाली. एकता बिष्‍टने  5 विकेट घेत पाकच्या टीम सुरुंग लावला. एकताने 10 ओव्हरर्समध्ये 18 रन्स दिले. मानसी जोशीने 2 विकेट घेतल्यात. दोघींच्या भेदक माऱ्यापुढे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे पाकची टीम नेस्तनाबूत झाली. एवढंच काय तर तीन जणांना भोपळाही फोडता आला नाही. 38.1 ओव्हरमध्ये पाकचा संघ 74 रन्सवर गारद झाला. भारताने तब्बल 95 रन्सने पाकचा धुव्वा उडवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2017 09:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading