Women World Cup: श्रीलंकेला धूळ चारत भारताचा विजयी 'चौकार'

Women World Cup: श्रीलंकेला धूळ चारत भारताचा विजयी 'चौकार'

या विजयासह भारताने क्रमवारीतही अव्वल स्थानावर झेप घेतलीये.

  • Share this:

05 जुलै : महिला वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने श्रीलंकेला 16 रन्सने पराभूत करत विजयी चौकार लगावलाय.

श्रीलंकेविरुद्ध टाॅस जिंकून भारताने प्रथम फलंदाजी केली. दिप्ती शर्मा आणि कर्णधार मिताली राजच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने 232 धावांचा डोंगर उभा केला. दिप्तीने 78 रन्स केले तर मिताली राजने 53 रन्स केले होते.

233 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या लंकनं टीमचा डंका वाजला. भारतीय महिला गोलदांजाच्या माऱ्यापुढे लंकनं टीम अपयशी ठरली.

अवघी टीम 216 रन्सवर गारद झाली. लंकेकडून दिलानी मनडोराने सर्वाधिक 61 रन्स केले.

भारताकडून झुलान गोस्वामीने 2 विकेट तर पुनम यादवने 2 विकेट घेतल्यात. या विजयासह भारताने क्रमवारीतही अव्वल स्थानावर झेप घेतलीये.

First published: July 5, 2017, 10:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading