Home /News /sport /

क्रिकेटसाठी झाली होती मुलगा, टीम इंडियाला जिंकून देणार वर्ल्ड कप?

क्रिकेटसाठी झाली होती मुलगा, टीम इंडियाला जिंकून देणार वर्ल्ड कप?

भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पहिल्यांदाच धडक मारली आहे. भारताच्या या कामगिरीत फलंदाज शेफाली वर्माचा मोठा वाटा आहे.

    मुंबई, 08 मार्च : भारतीय महिला क्रिकेट संघाने टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पहिल्यांदाच धडक मारली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने ही कामगिरी केली. यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावली ती भारताची सलामीची फलंदाज शेफाली वर्मा हिने. भारताच्या अनुभवी फलंदाजांनाही जे जमलं नाही ते तिनं केलं. चार डावात मिळून तिनं 161 धावा केल्या. भारताच्या इतर फलंदाजांपेक्षा सर्वात जास्त धावा तिनं काढल्या. आता फायनलमध्ये तिची भूमिका महत्वाची ठरणार आहे. शेफालीने चार सामन्यात 29, 39, 46 आणि 47 धावांची खेळी केली. तिच्यापेक्षा अनुभवी असलेल्या स्मृती मानधना, कर्णधार हरमनप्रीत कौर, जेमीमाह रॉड्रिग्ज यांनाही फारशी चमक दाखवता आली नाही. सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतीय टीमने फायनलपर्यंत धडक मारली असली तरी शेफालीने तिच्या फलंदाजीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल आयसीसीने सेमीफायनलआधी टी20 रँकिंग जाहीर केलं. यामध्ये भारताची  शेफाली वर्मा हिनं पहिलं स्थान पटाकवून इतिहास घडवला आहे. वयाच्या 16 व्या वर्षी आणि फक्त 18 टी20 सामने खेळत तिने दिग्गज महिला क्रिकेटपटूंना मागे टाकलं. शेफाली वर्माने 761 गुणांसह वर्ल्ड टी20 रँकिंगमध्ये 19 स्थानांनी झेप घेतली. तिनं न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला मागे टाकलं. आयसीसी टी20 रँकिंगमध्ये भारताच्या स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्जच्या क्रमवारीत 2 स्थानांनी घसरण झाली आहे. एक वर्षापूर्वी पदार्पण शेफालींनं गेल्या वर्षीच भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात पदार्पण केले होते. क्रिकेटमध्ये पदार्पण करताच शेफालीनं सचिन तेंडुलकरचा 30 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला होता. शेफालीनं 15 वर्ष 285 दिवसांत अर्धशतकी कामगिरी केली होती. शेफालीने आतापर्यंत 9 आंतरराष्ट्रीय टी -20 सामने खेळले आहेत. यात तिनं तब्बल. 142.30 च्या स्ट्राइक रेटने 222 धावा केल्या. ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 73 होती. क्रिकेट खेळण्यासाठी व्हावं लागलं होतं 'मुलगा' मुलगी असल्यानं हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील सर्व क्रिकेट अकॅडमीमध्ये तिला प्रवेश नाकारण्यात आला होता. पण क्रिकेट खेळायचंच हे स्वप्न उराशी बाळगलेल्या शेफालीने मुलग्यासारखी वेशभुषा करून प्रशिक्षण घेतलं असं तिच्या वडिलांनी सांगितलं. शेफालीच्या वडिलांनी सांगितलं की, मुलींसाठी रोहतकमध्ये एकही अकॅडमी नव्हती. त्यावेळी तिला प्रवेश मिळावा म्हणून भिक मागितली तरीही कोणी ऐकलं नाही. हे वाचा : धोनीचं ठरलंय! माजी निवड समिती प्रमुखांनी माहीच्या निवृत्तीबद्दल केला खुलासा शेफालीला शेवटी मुलीचे केस कापून तिला एका अकॅडमीत घेऊन गेलो आणि मुलाप्रमाणे प्रवेश घेतला. मुलांच्या संघातून खेळताना अनेकदा दुखापत झाली. तरीही न डगमगता तिने क्रिकेट खेळणं सुरू ठेवलं. तिच्या वडिलांनी सांगितलं की, मुलांविरुद्ध खेळणं सोप्पं नव्हतं. अनेकदा चेंडू हेल्मेटवर लागायचा. पण शेफालीने धैर्यानं सामना केला. एखादी मुलगी मुलगा होऊन खेळते तेव्हा तिला कोणीच कसं ओळखलं नाही असं विचारल्यानंतर शेफालीच्या वडिलांनी सांगितलं की, मला भिती होती पण कोणीही तिला ओळखलं नाही. वयच असं होतं की मुलगा मुलगी कळत नव्हतं. हे वाचा : आफ्रिका दौऱ्यात राहुल होऊ शकतो कर्णधार, विराटच्या फेव्हरेट खेळाडूला मिळणार डच्चू
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या