नवी दिल्ली, 07 मार्च : भारतीय महिला क्रिकेट संघ टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढणार आहे. यात विजय मिळवून भारतीय महिला संघ इतिहास घडवण्यासाठी उत्सुक आहे. याआधी महिला संघ 2005 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामन्यात पराभूत झाला होता. तेव्हा मिताली राजकडे टीम इंडियाचे नेतृत्व होते. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 4 बाद 215 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना टीम इंडिया 117 धावांत गारद झाली होती.
मितालीच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2017 मध्ये पुन्हा अंतिम फेरीत धडक मारली होती. यावेळी इंग्लंडने बाजी मारली होती. इंग्लंडने 50 षटकांत 7 बाद 228 धावा केल्या होत्या. तर भारतीय संघाला 48.4 षटकांत 219 धावाच करता आल्या होत्या. या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये हरमनप्रीतने नाबाद 171 धावांची तुफान फटकेबाजी केली होती.
सध्याच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये हरमनप्रीत फॉर्ममध्ये नाही. तिला 4 सामन्यात 2,8,1 आणि 15 धावाच करता आल्या आहेत. मात्र भारतीय संघाला हरमनप्रीतकडून अंतिम सामन्यात फटकेबाजीची अपेक्षा आहे. भारत पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. 2005 आणि 2017 मध्ये मितालीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हुकलेला विजेतेपदाचा मुकुट हरमनप्रीतला मिळवण्याची संधी आहे.
भारताच्या महिला संघाने टी20 वर्ल्ड कप जिंकला तर अशी कामगिरी करणारी ती भारताची तिसरी कर्णधार ठरेल. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या पुरुष संघाने 1983 मध्ये विंडिजला पराभूत करून पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर 2007 मध्ये पुरुष टी20 आणि 2011 मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता.
हे वाचा : महिला टी20 वर्ल्ड कप फायनलआधी PM मोदी VS मॉरिसन Twitter वॉर
अंतिम सामन्यात समोर समोर भीडणाऱ्या संघानीच वर्ल्ड कपच्या उद्घाटनाचा सामना खेळला होता हा एक योगायोग आहे. त्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी पराभूत केलं होतं. भारतीय महिला संघ पहिल्यांदा महिला टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.
हे वाचा : भारत-ऑस्ट्रेलिया फायनलवरही पावसाचे सावट, सामना रद्द झाल्यास काय होणार?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket