ICC Women's T20 World Cup : शेफालीला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाची रणनिती काय?

ICC Women's T20 World Cup : शेफालीला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाची रणनिती काय?

महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत मोठी धावसंख्या उभारली. आता भारतीय फलंदाजांना रोखण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल.

  • Share this:

मुंबई, 08 मार्च : महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने तुफान फटकेबाजी करत शतकी भागिदारी केली. यष्टीरक्षक हिली आणि मूनी यांनी भारतीय गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने भारताच्या फलंदाजीला रोखण्यासाठी खास रणनिती आखली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने महिला संघाला एक सल्ला दिला आहे. त्यानुसार ऑस्ट्रेलिया टीम भारताची युवा फलंदाज शेफाली वर्माला रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करेल. यासाठी त्यांनी खास प्लॅनही तयार केला आहे.

शेफालीने आतापर्यंत स्पर्धेत 161 धावा केल्या आहेत. प्रत्येक सामन्यात भारतीय संघाला चांगली सुरुवात तिने करून दिली. तिच्याशिवाय भारतीय फलंदाजांमध्ये स्मृती मानधना, हरमनप्रीत, जेमिमा आणि अष्टपैलू दीप्ति शर्मा यांचा समावेश आहे. मात्र या सर्वांपेक्षा सध्या शेफाली वर्मा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना आव्हान ठरू शकते.

शेफालीला रोखण्यासाठी तिच्या कमकुवत बाजूंची माहिती असायला हवी. त्यानुसारच ऑस्ट्रेलियाच्या संघाने रणनिती आखली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने तिला गोलंदाजी केली आहे. त्यामुळे तिचे कच्चे दुवे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना माहिती आहेत. तिला अपयश येतं तेव्हा ती भावनिक होते. ऑस्ट्रेलिया शेफालीला कसं रोखणार हे पाहावं लागेल.

हे वाचा : Road Safty World Series : पहिल्याच चेंडूवर सेहवागचा 'पुराना' अंदाज, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियाची कर्णधार लेनिंगने म्हटलं होतं की, आम्हाला फक्त पूनमच्या आव्हानाची चिंता नाही तर राजेश्वरी गायकवाड सारखी चांगली फिरकीपटू भारताकडे आहे. सामन्याच चित्र बदलण्याची क्षमता असलेले खेळाडू भारताकडे आहेत. असंही लेनिंगने सांगितलं होतं. त्यानुसारच ऑस्ट्रेलियानं फलंदाजी केल्याचं दिसतं. आता भारतीय फलंदाजी कशी कामगिरी करते ते महत्वाचं ठरणार आहे.

पहिल्या 24 चेंडूत खेळाडूंनी केल्या 2 मोठ्या चूका, टीम इंडियाला पडणार महागात

First published: March 8, 2020, 1:50 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या