मेलबर्न, 08 मार्च : आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना आज भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. जागतिक महिला दिनी भारतीय संघ एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. गेल्या सात वर्षात भारताने एकदाही अंतिम फेरीत प्रवेश केलेला नाही. त्यामुळं हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारत पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यास सज्ज आहे. मात्र या स्पर्धेत अनेक सामन्यात पावसाने फेरले आहे. मात्र अंतिम सामन्यावर पाऊस पाणी फिरवणार की नाही, याबाबत हवमान खात्याने महत्त्वाची माहिती दिली आहे.
पावसामुळं भारत-इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामनाही रद्द झाला. आयसीसीच्या नियमानुसार भारताने थेट फायनलमध्ये प्रवेश केला. तर, दुसरा सामन्याचा निकाल डकवर्थ लुइसने लागला. मात्र आता फायनल सामन्यावरही काही प्रमाणात पावसाचे सावट आहे.
वाचा-भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल सामन्यात पाक कनेक्शन, वाचा काय आहे प्रकरण
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मेलबर्नमध्ये काही प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र सकाळी काही काळ पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यानंतर पूर्ण दिवस ऊन असेल. त्यामुळं सामना होऊ शकतो. तर, सायंकाळी थोडासा थंडावा असेल मात्र, आकाश स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, आयसीसीच्या वतीने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळं पावसामुळे सामना न झाल्यास हा सामना सोमवारी राखीव दिवशी होईल.
वाचा-क्रिकेट खेळण्यासाठी झाली होती मुलगा, टीम इंडियाला जिंकून देणार वर्ल्ड कप
दरम्यान, उपांत्य सामन्यांमध्ये अशी कोणतीही व्यवस्था नव्हती. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामन्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळं गुणतालिकेनुसार भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसर्या उपांत्य सामन्यालादेखील पावसाने फटका बसला परंतु ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमांतर्गत दक्षिण आफ्रिकेला पाच धावांनी पराभूत करून विजेतेपद जिंकले.
वाचा-ICC Women's T20 World Cup : महिला दिनी हरमनप्रीतला इतिहास रचण्याची संधी
भारत-ऑस्ट्रेलिया यांचा रेकॉर्ड
या दोन्ही संघाच्या रेकॉर्डबाबत बोलायचे झाल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ भारतावर भारी पडू शकतो. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 19 सामने झाले आहेत. यात भारताने 6 तर ऑस्ट्रेलियाने 13 सामने जिंकले आहेत. पण गेल्या पाच सामन्यात भारताने 3 सामन्यात ऑस्ट्रेलियाता पराभूत केले आहे.