ICC Women's T20 World Cup Final Aus W vs Ind W: भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल सामन्यात पाक कनेक्शन, वाचा काय आहे प्रकरण

ICC Women's T20 World Cup Final Aus W vs Ind W: भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल सामन्यात पाक कनेक्शन, वाचा काय आहे प्रकरण

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज आयसीसी महिला वर्ल्ड कप टी-20 स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.

  • Share this:

मेलबर्न, 08 मार्च : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज आयसीसी महिला वर्ल्ड कप टी-20 स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. हा महामुकाबला मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर होईल. दरम्यान याआधी पावसामुळं सेमीफायनलच्या सामन्यावर पाणी फेरले होते. त्यामुळं भारत-इंग्लंड यांच्यातील उपांत्या फेरीतील सामना रद्द झाला आणि गुणतालिकेतील गुणांच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला. साखळी फेरीत भारताने एकही सामना गमवला नव्हता. त्यामुळं भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मात्र या हायवोल्टेज महामुकाबल्यात एक खास पाकिस्तान कनेक्शनही आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्यात पंचाची महत्त्वपूर्ण भुमिका पाकचे एहसान रजा बजावणार आहेत. तर, न्यूझीलंडचे किम कॉटन हे क्षेत्ररक्षण पंच म्हणून काम करतील. आयसीसीच्या वतीने अंतिम सामन्याआधी पंचांच्या नावाची यादी जाहीर केली. यात या दोन पंचाचे नाव देण्यात आले आहे. क्रिकेट सामन्यात पंचाचे महत्त्व सर्वांना ठावूक आहे. त्यामुळं भारताचा वर्ल्ड कप हा एहसान रजा यांच्या हाती असणार आहे. या महामुकाबल्यात महिला आणि पुरुष पंचांची नेमणुक करण्यात आली आहे.

वाचा-क्रिकेट खेळण्यासाठी झाली होती मुलगा, टीम इंडियाला जिंकून देणार वर्ल्ड कप

आयसीसीने रविवार होणाऱ्या सामन्याआधी, कॉटन पाकिस्तानचे पंच रजा यांच्यासोबत पंचाची भुमिका निभावतील. पहिल्यांदाच अंतिम सामन्यात कॉटन पंच म्हणून काम करणार आहेत. तर, या सामन्यात वेस्ट इंडिजचे जॉर्ज ब्रेथवेट तिसरे पंच असणार आहे.

वाचा-क्रिकेट खेळण्यासाठी झाली होती मुलगा, टीम इंडियाला जिंकून देणार वर्ल्ड कप

भारत-ऑस्ट्रेलिया यांचा रेकॉर्ड

या दोन्ही संघाच्या रेकॉर्डबाबत बोलायचे झाल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ भारतावर भारी पडू शकतो. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 19 सामने झाले आहेत. यात भारताने 6 तर ऑस्ट्रेलियाने 13 सामने जिंकले आहेत. पण गेल्या पाच सामन्यात भारताने 3 सामन्यात ऑस्ट्रेलियाता पराभूत केले आहे.

वाचा-महिला टी20 वर्ल्ड कप फायनलआधी PM मोदी VS मॉरिसन Twitter वॉर

भारताचा फायनलपर्यंतचा प्रवास

या स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी हरवून स्पर्धेचा विजयी शुभारंभ केला होता. त्यानंतर भारताने बांगलादेशचा 18 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाविरुध्द टीम इंडियाला 3 धावांचा थरारक विजय मिळाला. शेवटच्या लीग सामन्यात भारताने श्रीलंकेला 7 गडी राखून पराभूत केले. उपांत्य सामन्यात इंग्लंडबरोबरचा सामना होता पण पावसामुळे हा खेळ रद्द करण्यात आला आणि गटातील टप्प्यातील सर्व सामने जिंकल्यामुळे टीम इंडियाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळाले.

First published: March 8, 2020, 9:32 AM IST

ताज्या बातम्या