मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

INDW vs SAW: वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी साजरा केला भारताचा पराभव, ड्रेसिंगरुममधील तो VIDEO व्हायरल

INDW vs SAW: वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी साजरा केला भारताचा पराभव, ड्रेसिंगरुममधील तो VIDEO व्हायरल

South Africa

South Africa

आयसीसी महिला विश्वचषक (Women's World Cup) 28 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) भारताचा 3 गडी राखून पराभव करत टीम इंडियाचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. या विजयानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी आनंद साजरा केला.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 28 मार्च: आयसीसी महिला विश्वचषक (Women's World Cup) 28 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) भारताचा 3 गडी राखून पराभव करत टीम इंडियाचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. भारताच्या (India) पराभवानंतर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. या विजयानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी आनंद साजरा केला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विंडीजच्या खेळाडूंचा आनंद साजरा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये भारताच्या पराभवावर कॅरेबियन खेळाडू हॉटेलच्या खोलीत आनंदाने नाचू लागले. खेळाडू जोरात उड्या मारत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. महिला वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने भारतासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सामना अतिशय महत्त्वाचा होता. ऑस्ट्रेलियाने संपूर्ण साखळी फेरीत अजेय राहात सर्वप्रथम उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता. त्यांच्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेनेही उपांत्य फेरीत धडक मारली होती. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि भारतीय संघांमध्ये चुरस होती. Womens World Cup : मिताली-झुलनच्या स्वप्नांचा चुराडा, वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न अधूरंच
  भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी इंग्लंडने बांगलादेशवर मोठा विजय मिळवत उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मान मिळवला होता. त्यामुळे आता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याच्या जय-पराजयावर उपांत्य फेरीतील चौथा संघ अवलंबून होता. भारताने हा सामना जिंकला असता तर त्यांनी उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले असते. परंतु त्यांनी जर हा सामना गमावला तर वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत जाणारी चौथी टीम ठरली असती.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Icc, South africa, Team india

  पुढील बातम्या