'खूब लड़ी मर्दानी', वर्ल्डकप जिंकण्याची संधी हुकली

'खूब लड़ी मर्दानी', वर्ल्डकप जिंकण्याची संधी हुकली

अटीतटीच्या लढतीत इंग्लंडने 9 रन्सने विजय मिळवत वर्ल्डकपवर नावं कोरलं

  • Share this:

23 जुलै : लाॅडर्सच्या मैदानावर भारताची महिला टीम इतिहास रचणार अशी अपेक्षा होती मात्र  अटीतटीच्या लढतीत इंग्लंडने 9 रन्सने विजय मिळवत महिला वर्ल्डकपवर नावं कोरलं. भारताचा संघ 218 रन्सवर गारद झाला. वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगुण मैदानात उतरलेल्या 'रणरागिणीं'चा मात्र विजयाच्या उंबरठ्यावर असताना पराभवाला सामोरं जावं लागलं.

इंग्लंडने दिलेल्या 229 धावांचं टार्गेटला पाठलाग करताना टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. दुसऱ्याचं ओव्हरमध्ये स्मतृी मानधना आऊट झाली. त्यानंतर कॅप्टन मिताली राज आली पण तिचाही जादू फार काळ चालला नाही. 17 रन्स करून ती आऊट झाली. पूनम राऊत आणि हरमप्रीत कौरने एकाकी झुंज देत टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवला. भारताचा स्कोअर 191 रन्सवर असताना पूनम राऊत 86 रन्सवर आऊट झाली. वैद कृष्णमृर्तीने 35 रन्स करत भारताचा विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. भारताचा विजय आता अगदी टप्प्यात आला होता. पण 200 रन्सवर वैद कृष्णमृर्ती आऊट झाली. त्यानंतर दीप्ती शर्माने फटकेबाजी करत भारताचा स्कोअऱ वाढवण्याचा प्रयत्न केला. पण दीप्ती शर्माला तळाच्या फलंदाजीनी पुरेशी साथ दिली नाही. अवघ्या 11 रन्स दूर असताना दीप्ती शर्मा आऊट झाली. विजयाच्या अगदी जवळ असताना तळाच्या फलंदाजीने घात केला. अवघ्या 9 रन्सने भारताच्या हातातून वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगलं.

इंग्लंडची इनिंग

इंग्लंडने टाॅस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. होमग्राऊंडवर खेळत असताना इंग्लंडची सुरुवात चांगली राहिली. लाॅरेन विनफील्डने 23 तर टॅमी ब्युमोंटने 23 रन्स करत चांगली सुरुवात करून दिली. त्यामुळे भारताला 47 रन्सवर पहिली विकेट मिळवण्यात यश आलं. पण चांगल्या सुरुवातीनंतर इंग्लंडची टीम ढासळली. 63 रन्सवर इंग्लंडचे 3 गडी बाद झाले. भारताला पहिली विकेट राजेश्वरी गायकवाड यांनी दिली. तिने विनफील्डला क्लीन बोल्ड केलं.  तर पुनम यादवने टॅमी ब्युमोंटला आऊट केलं. त्यानंतर मैदानात आलेली इंग्लंडची कॅप्टन हीथर नाईट अपयशी ठरली. अवघा एक रन करून आऊट झाली. इंग्लंडची टीम भराभरा स्कोअर उभारत असताना झुलन  गोस्वामीने सुरुंग लावला. महत्वाच्या तीन विकेट घेऊन झुलनने टीमची पकड मजबूत केली.

इंग्लंड 200 रन्सचा टप्पा गाठणार नाही अशी शक्यता असताना कॅथरीन ब्रंटने 34 रन्स तर जैनी गनने नाबाद 25 रन्सकरून 200 रन्सचा टप्पा पार करून दिला. ब्रंट 34 रन्सवर रनआऊट झाल्यानंतर लाॅरा मार्शने 14 रन्सची खेळी करत टीमचा 228 पर्यंत नेला. इंग्लंडने भारताचा 9 रन्सने पराभव करत वर्ल्डकपचं चौथ्यांदा जेतेपद पटकावलंय.

First published: July 23, 2017, 10:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading