महिला टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारताला धक्का, स्मृती मानधनाला दुखापत

महिला टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारताला धक्का, स्मृती मानधनाला दुखापत

महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. पहिल्याच सामन्यात सलामीवीर स्मृती मानधनाला दुखापत झाली आहे.

  • Share this:

सिडनी, 21 फेब्रुवारी : महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. पहिल्याच सामन्यात सलामीवीर स्मृती मानधनाला दुखापत झाली आहे. क्षेत्ररक्षणावेळी सीमारेषेबाहेर बोर्डावर आदळली. त्यानंतर खांद्याला दुखापत झाल्यानं फिजिओंच्या सल्ला घेतला. त्यानंतर मानधना मैदातून बाहेर गेली. मानधनाच्या जागी प्रिया पुनिया क्षेत्ररक्षणासाठी उतरली.सामन्याच्या पहिल्याच षटकात ही घटना घडली.थोड्यावेळाने स्मृती पुन्हा मैदानात उतरली असली तरी भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 132 धावा केल्या. दिप्ती शर्माच्या नाबाद 49 धावांच्या खेळीमुळे भारताचा डाव सावरला. सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारताची सुरुवात अडखळत झाली. आघाडीचे तीन फलंदाज लागोपाठ बाद झाले. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी 41 धावांची भागिदारी केली. स्मृती मानधना बाद झाल्यानंतर शेफाली आणि हरमनप्रीत कौर लगेच बाद झाल्या.

स्मृती मानधना 10 धावांवर बाद झाली. तिच्यानंतर शेफाली 29 धावा करून झेलबाद झाली. त्यानंतर पुढच्याच षटकात हरमनप्रीत कौर अवघ्या दोन धावांवर बाद झाली. भारताची अवस्था एकवेळ 3 बाद 47 अशी झाली होती. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज आणि दिप्ती शर्मा यांनी सूत्रे हाती घेतली. दोघींनी अर्धशतकी भागिदारी केली. जेमिमा 16 व्या षटकात 26 धावांवर बाद झाली. त्यानंरत वेदा कृष्णमूर्तीसोबत दिप्तीने संघाची धावसंख्या 132 पर्यंत नेली. दिप्ती 49 धावांवर तर वेदा 9 धावांवर नाबाद राहिली.

वाचा : दिप्ती शर्माची एकाकी झुंज, ऑस्ट्रेलियाला 133 धावांचे आव्हान

भारतीय संघाला आपल्या फॉर्ममध्ये सातत्य राखता आलेले नाही. त्यामुळं ऑस्ट्रेलिया पराभूत करणे भारतासमोर मोठे आव्हान असणार आहे. याआधी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात टक्कर झाली होती. मात्र अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळं यजमान संघाकडून पराभव पत्करावा लागला.

वाचा : ‘IPLसाठी चिअर गर्ल्स मिळाल्या’, पाक महिला संघाच्या त्या डान्सवर भडकले चाहते

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2020 03:35 PM IST

ताज्या बातम्या