World Cup : 1 ट्रॉफी, 46 दिवस, 10 संघ...या दिवशी असतील भारताचे सामने

World Cup : 1 ट्रॉफी, 46 दिवस, 10 संघ...या दिवशी असतील भारताचे सामने

भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 मे : विश्वचषकासाठी आता केवळ नऊ दिवसांचा कालावधी उरला असताना, सध्या सर्व संघ जय्यत तयारी करित आहे. 30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघ आज इंग्लंडसाठी रवाना झाला आहे. दरम्यान यावेळी चॅम्पियन चषक मिळवण्यासाठी 10 संघ एकमेकांविरोधात भिडणार आहेत. तर, राऊंड रॉबिन आणि नॉकआऊट फॉर्माटमध्ये होणारे हे सामने एकूण 46 दिवस चालणार आहेत. प्रत्येक संघाला विरोधी संघाशी किमान एकदा सामना खेळणे बंधनकारक असणार आहे.

यंदाची ही 12वी विश्वचषक स्पर्धा असल्यामुळं सर्व, क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या इंग्लंडमध्ये 30 मेपासून या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. इंग्लंडमधील मैदानात 11 सामने खेळले जाणार आहेत.

27 वर्षांनी झाला मोठा बदल

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत 27 वर्षांनी राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्घतीने संघ एकमेकांसोबत खेळतील. यामुळे स्पर्धेत मोठी रंगत येणार आहे. मात्र, यामुळे टॉपच्या संघांसाठी ही धोक्याची घंटा असण्याची शक्यता आहे. राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाची एकमेकांशी लढत होते. यात कोणत्याही संघाला कमी किंवा जास्त करता येत नाही. प्रत्येक संघाला त्यांची ताकद अजमावण्याची संधी मिळते. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान या संघांना दावेदार मानलं जात आहे. मात्र, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघही टॉप 4 मध्ये पोहचू शकतात. 1992 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत या पद्धतीने सामने झाले होते.

असे असतील भारताचे सामने

5 जून : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका (दु. 3 वाजता)

9 जून : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिय (दु. 3 वाजता)

13 जून : भारत विरुद्ध न्युझीलॅंड (दु. 3 वाजता)

16 जून : भारत विरुद्ध पाकिस्तान (दु. 3 वाजता)

22 जून : भारत विरुद्ध अफगाणिस्तान (दु. 3 वाजता)

27 जून : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (दु. 3 वाजता)

30 जून : भारत विरुद्ध इंग्लंड (दु. 3 वाजता)

2 जुलै : भारत विरुद्ध बांगलादेश (दु. 3 वाजता)

6 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (दु. 3 वाजता)

2019 च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक

वाचा- IPL मधील 'हा' महागडा खेळाडू ऐनवेळी इंग्लंडच्या संघात

वाचा- 106 कर्णधार तोडू शकले नाहीत 'दादा'चा विक्रम, विराटला संधी!

वाचा- सत्य कटू असतं, पाकच्या खेळाडूने केला असा निषेध

VIDEO : वर्ल्डकपसाठी काय आहे टीमचा प्लॅन? विराट कोहलीची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 06:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading