आता नो-बॉलवरून होणार नाही राडा, ICCने घेतला 'हा' मोठा निर्णय!

नो-बॉल वादावर तोडगा म्हणून आता आयसीसीनं आपल्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 05:07 PM IST

आता नो-बॉलवरून होणार नाही राडा, ICCने घेतला 'हा' मोठा निर्णय!

नवी दिल्ली, 22 जुलै : पंचांची एक चूक सामन्याची दिशा बदलली जाते. याचा अनुभव ICC Cricket World Cupमध्ये पाहायला मिळाला. यात काही सामन्यांमध्ये एक नो बॉल संपूर्ण चित्र बदलू शकते. काही वेळा पंच नो-बॉलचा निर्णय देत नाहीत त्यामुळं फलंदाजाला बाद घोषित केले जाते. त्यानंतर घेतलेल्या रिप्लेमध्ये तो चेंडू नो-बॉल असल्याचे निष्पण होते, आतापर्यंत अनेक वेळा अशा वादग्रस्त प्रसंग झाले आहे. त्यामुळं आयसीसीनं या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी आता नो-बॉल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. हे तंत्रज्ञान सर्वप्रथम भारतात वापरले जाणार आहे.

मुंबई मिररनं दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीनं नुकतेच क्रिकेटमधील अनेक नियमांमध्ये बदल केले. ज्यामुळं आता खेळाडूंना फायदा होणार आहे. त्यामुळंच आता नो-बॉल वादावर तोडगा म्हणून हा तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. दरम्यान याबाबत आयसीसी किंवा बीसीसीआयच्या वतीने अधिकृत माहिती मिळालेली नाही.

वाचा- INDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक?

काय आहे नो-बॉल तंत्रज्ञान

या तंत्रज्ञानाचा वापर करून गोलंदाजाच्या पायावर विशेष नजर ठेवली जाणार आहे. गोलंदाज जेव्हा मैदानावर आपला पाय ठेवेल तेव्हा त्याजवळ असलेल्या कॅमेराच्या मदतीनं तिसरे पंच नजर ठेऊ शकतात. जर, पाय लाईनच्या बाहेर असेल तर तिसरे पंच मैदानावरील पंचांना याबाबत माहिती देतील. दरम्यान सध्या डीआरएसच्या माध्यमातून नो-बॉल होता की नाही हे पाहिले जाते. तसेच, बीसीसीआयनं केलेल्या मागणीनुसार भारतात होणार्या सामन्यात याचा प्रयोग केला जाणार आहे.

Loading...

वाचा-मुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट!

का होतोय या तंत्रज्ञानाचा वापर

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यात नो-बॉलवरून बाद झाला होता. यानंतर बीसीसीआयनं आयसीसीकडे या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मागणी केली होती.

वाचा- World Cup च्या संघातून रायडुला का वगळले? निवड समितीच्या प्रमुखांनी केला खुलासा

VIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: BCCIICC
First Published: Jul 22, 2019 05:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...