ICCचे 'नो बॉल' तंत्रज्ञान, आता वन डे सामन्यांचे चित्रच बदलणार!

ICC : आयसीसीच्या वतीनं टिव्ही अम्पायरना सशक्त करण्यासाठी लवकरच नो-बॉल तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 04:48 PM IST

ICCचे 'नो बॉल' तंत्रज्ञान, आता वन डे सामन्यांचे चित्रच बदलणार!

दुबई, 07 ऑगस्ट : पंचांची एक चूक सामन्याची दिशा बदलली जाते. याचा अनुभव ICC Cricket World Cupमध्ये पाहायला मिळाला. यात काही सामन्यांमध्ये एक नो बॉल संपूर्ण चित्र बदलू शकते. काही वेळा पंच नो-बॉलचा निर्णय देत नाहीत त्यामुळं फलंदाजाला बाद घोषित केले जाते. त्यानंतर घेतलेल्या रिप्लेमध्ये तो चेंडू नो-बॉल असल्याचे निष्पण होते, आतापर्यंत अनेक वेळा अशा वादग्रस्त प्रसंग झाले आहे. त्यामुळं आयसीसीनं या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी आता नो-बॉल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयसीसीच्या वतीनं टिव्ही अम्पायरना सशक्त करण्यासाठी लवकरच नो-बॉल तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. कमी ओव्हरच्या सामन्यात आधी या तंत्रज्ञानाचे परिक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर काही महिन्यांनी हे तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय सामन्यात वापरले जाणार आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 2016 साली झालेल्या एकदिवसीय सामन्यात याचे परिक्षण करण्यात आले होते, मात्र आता मोठ्या स्थरावर याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान याबाबत आयसीसी वतीने अधिकृत माहिती मिळालेली नाही.

वाचा-चाहर बंधूआधी 'या' भावांच्या जोडीनं गाजवलं क्रिकेटचं मैदान!

काय आहे नो-बॉल तंत्रज्ञान

या तंत्रज्ञानाचा वापर करून गोलंदाजाच्या पायावर विशेष नजर ठेवली जाणार आहे. गोलंदाज जेव्हा मैदानावर आपला पाय ठेवेल तेव्हा त्याजवळ असलेल्या कॅमेराच्या मदतीनं तिसरे पंच नजर ठेऊ शकतात. जर, पाय लाईनच्या बाहेर असेल तर तिसरे पंच मैदानावरील पंचांना याबाबत माहिती देतील. दरम्यान सध्या डीआरएसच्या माध्यमातून नो-बॉल होता की नाही हे पाहिले जाते. तसेच, बीसीसीआयनं केलेल्या मागणीनुसार भारतात होणार्या सामन्यात याचा प्रयोग केला जाणार आहे.

Loading...

वाचा-'विराट तू स्वार्थी आहेस', रोहितला विश्रांती दिल्यानं चाहते भडकले

का होतोय या तंत्रज्ञानाचा वापर

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यात नो-बॉलवरून बाद झाला होता. यानंतर बीसीसीआयनं आयसीसीकडे या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मागणी केली होती.

वाचा- सचिनची 30 वर्षांपूर्वी ज्यांनी केली निवड, त्यांनीच दिली अर्जुनला संघात जागा!

VIDEO: ट्रॅकवर येऊन थेट गजराजाने रोखली ट्रेन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 04:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...