मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 वर नवं संकट, ICC ने वाढवलं BCCI चं टेन्शन!

IPL 2021 वर नवं संकट, ICC ने वाढवलं BCCI चं टेन्शन!

आयपीएलच्या (IPL 2021) उरलेल्या 31 सामन्यांचं आयोजन 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये (UAE) होईल, तर फायनल 15 ऑक्टोबरला खेळवली जाईल, असं वृत्त आहे, पण आयसीसीने (ICC) आयपीएलच्या या वेळापत्रकावर आक्षेप घेतला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 8 जून : आयपीएलच्या (IPL 2021) उरलेल्या 31 सामन्यांचं आयोजन 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये (UAE) होईल, तर फायनल 15 ऑक्टोबरला खेळवली जाईल, असं वृत्त आहे, पण आयसीसीने (ICC) आयपीएलच्या या वेळापत्रकावर आक्षेप घेतला आहे. आयपीएलची फायनल 15 ऑक्टोबरला होऊ नये, असं आयसीसीला वाटत आहे. आयसीसी 18 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) आयोजनाचा विचार करत आहे, पण जर आयपीएल फक्त 3 दिवस आधी संपली तर याचा परिणाम वर्ल्ड कपच्या आयोजनावर होईल, असं आयसीसीचं म्हणणं आहे.

'टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी येणाऱ्या टीम आपल्या खेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी कशी देतील? बीसीसीआयने (BCCI) आयपीएल 10 ऑक्टोबरच्या पुढे नेऊ नये,' असं आयसीसीने सांगितलं आहे. इनसाईड स्पोर्ट्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

आयसीसीने मागच्या वर्षी जुलै महिन्यातच वर्ल्ड कप 2021 ऑक्टोबरच्या मध्यात सुरू होईल आणि 14 नोव्हेंबरला फायनल खेळवली जाईल, असं स्पष्ट केलं होतं.

आयसीसीने आयपीएलच्या आयोजनाबाबत नाराजी व्यक्त केल्यामुळे बीसीसीआयच्या अडचणी वाढल्या आहेत, त्यामुळे आता बीसीसीआय पुन्हा आयपीएलचं वेळापत्रक बदलणार का? का आयसीसीला आयपीएलमुळे टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलावा लागणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

जर आयसीसीने बीसीसीआयला 10 ऑक्टोबरला आयपीएल संपवायला सांगितलं तर मोठी अडचण निर्माण होईल. बीसीसीआयने आधीच आयपीएल संपवण्यासाठी 25 दिवसांची गरज आहे, असं सांगितलं होतं. टी-20 वर्ल्ड कप कुठे खेळवला जाणार, याबाबतही अजून कोणताही निर्णय झालेला नाही. भारतातल्या कोरोनाच्या स्थितीमुळे टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन दुसऱ्या देशात केलं जाऊ शकतं. आयसीसीपुढे सध्या तरी यासाठी युएई आणि श्रीलंकेचे पर्याय आहेत.

First published:

Tags: BCCI, Cricket, Icc, IPL 2021, T20 world cup