Home /News /sport /

U19 World Cup : टीम इंडियाला कोरोनाचा विळखा, 11 खेळाडूंची निवडही अवघड

U19 World Cup : टीम इंडियाला कोरोनाचा विळखा, 11 खेळाडूंची निवडही अवघड

वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये (U19 World Cup 2022) टीम इंडियाला कोरोनाचा विळखा बसला आहे. त्यामुळे युगांडा विरुद्ध आज होणाऱ्या मॅचमध्ये 11 खेळाडूंची निवड करणे देखील अवघड आहे.

    मुंबई, 22 जानेवारी : वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये (U19 World Cup 2022) टीम इंडियाला कोरोनाचा विळखा बसला आहे. आयर्लंड विरुद्धच्या मॅचपूर्वी कॅप्टन यश ढूलसह (Yash Dhull) 6 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. शुक्रवारी झालेल्या नव्या RT-PCR टेस्टमध्ये यशसह 5 खेळाडू पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे युगांडा विरुद्ध आज (शनिवारी) होणाऱ्या मॅचमध्ये प्लेईंग 11 निवडताना टीम मॅनेजमेंटला कोणताही पर्याय उपलब्ध नसेल. आयर्लंड विरुद्धच्या मॅचपूर्वी 6 खेळाडू आयसोलेशनमध्ये होते. त्यापैकी फक्त ऑल राऊंडर वासू वत्स याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. तर यश ढूल, आराध्य यादव, एसके रशिद, मानव पारीख या सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. टीम इंडियासाठी दिलासादायक बाब म्हणजे आयर्लंड विरुद्ध खेळलेल्या सर्व 11 खेळाडूंचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. युगांडा विरुद्धच्या लढतीमध्येही याच 11 खेळाडूंसह टीम इंडियाला मैदानात उतरावं लागेल. टीम इंडियानं वर्ल्ड कप स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये यापूर्वीच प्रवेश केला आहे. भारताने ही मॅच देखील जिंकून ग्रुपमध्ये पहिला क्रमांक पटकावला तर पुढील लढत 29 जानेवारी रोजी होईल. या लढतीपूर्वी सर्व खेळाडूंनी फिट होणे आवश्यक आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील नियमानुसार सर्व कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंना पाच दिवस आयसोलेशनमध्ये राहणे आवश्यक आहे. या कालावधीत त्यांचा तीन वेळा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांचा टीममध्ये पुन्हा समावेश होईल. अर्थात बायो-बबलमध्ये असलेल्या भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण कशी झाली हा प्रश्न आहे. IPL 2022 Mega Auction : पहिली यादी उघड, 'या' खेळाडूंची आहे सर्वात जास्त किंमत! कशी झाली कोरोनाची एन्ट्री यूएईमध्ये आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय टीम हॉलंडमार्गे वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाली. गयानामध्ये दाखल झाल्यानंतर टीम इंडियातील सर्व सदस्यांना पाच दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागले. या कालावधीमध्ये सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यूएई ते वेस्ट इंडिजमधील प्रवासात या सदस्याच्या संपर्कात असलेल्या सर्वांना कोरोनाची लागण झाली, असे मानले जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Cricket news, Team india

    पुढील बातम्या