मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Under 19 WC :वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारतासमोर 69 धावांचं आव्हान

Under 19 WC :वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारतासमोर 69 धावांचं आव्हान

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या संघाला 68 धावांवर सर्वबाद केले. इंग्लंडने आता भारतासमोर विजयासाठी ६९ धावांचे आव्हान दिले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 जानेवारी : आयसीसीच्या अंडर 19 महिला वर्ल्ड कप स्पर्धेत सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अंतिम सामना सुरु आहे. पहिल्यांदाच आयसीसीतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून भारतीय महिला क्रिकेट संघ हा वर्ल्ड कप जिंकून नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या संघाला 68 धावांवर सर्वबाद केले. इंग्लंडने आता भारतासमोर विजयासाठी ६९ धावांचे आव्हान दिले आहे.

आयसीसी अंडर 19 महिला वर्ल्ड कपचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेच्या Senwes park , Potchefstroom येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या सुरुवातीला झालेली नाणेफेक भारतीय संघाने जिंकली. नाणेफेक जिंकत त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार शेफाली वर्माचा हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी अतिशय खरा ठरवला.

हे ही वाचा  : शोएब अख्तर मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात झाला होता वेडा! किडनॅपिंगचा ही केला होता प्लॅन

सामन्याला सुरुवात होताच काही वेळात भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचे एक एक फलंदाज बाद झाले. भारताची गोलंदाज तितास साधू, पार्श्वि चोप्रा आणि  अर्चना देवी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर कर्णधार शेफाली वर्मा, सोनम यादव आणि मन्नत कश्यप हिने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

First published:

Tags: Cricket