१९ वर्षांखालील आयसीसी विश्वचषकात भारताची सलामी लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध

१९ वर्षांखालील आयसीसी विश्वचषकात भारताची सलामी लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध

पुढच्या वर्षी न्यूझीलंडमध्ये ही स्पर्धा होणार आहे.१३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा खेळली जाणार आहे.७ शहरांमध्ये सामने होणार आहेत.

  • Share this:

अमित मोडक, 18 आॅगस्ट : १९ वर्षांखालील आयसीसी विश्वचषकात भारताची सलामी लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.तर गतविजेता वेस्ट इंडीजचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध असेल.

१९ वर्षांखालील विश्वचषकाच वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आलं. पुढच्या वर्षी न्यूझीलंडमध्ये ही स्पर्धा होणार आहे.१३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा खेळली जाणार आहे.७ शहरांमध्ये सामने होणार आहेत.

या विश्वचषकात १६ संघ सहभागी होणार आहे.या स्पर्धेसाठी चार गट करण्यात आलेत.प्रत्येक गटामध्ये चार संघाचा समावेश करण्यात आलाय.भारताचा समावेश ब गटात करण्यात आलाय.यामध्ये भारतासह ऑस्ट्रेलिया ,झिम्बाब्वे आणि पापुआ न्यू गुनिया या संघांचा समावेश आहे.तर पाकिस्तानचा समावेश ड करण्यात आलाय. प्रत्येक गटातले पहिले दोन संघ सुपर लीगमध्ये जातील. सुपर लीगमध्ये एकूण २० सामने खेळले जातील.यामध्ये उपांत्यपूर्व,उपांत्य आणि अंतिम सामन्याचा समावेश आहे.

जे आठ संघ सुपर लिगपर्यंत पोहचणार नाही, त्या आठ संघादरम्यान प्लेट चॅम्पियनशिप खेळवण्यात येणार आहे. ३ फेबेरुवारीला बे-ओव्हल येथे अंतिम लढत होणार आहे.

युवा विश्वचषक - गट

गट अ - वेस्ट इंडीज,न्यूझीलंड,दक्षिण आफ्रिका,केनिया

गट ब - भारत,ऑस्ट्रेलिया ,झिम्बाब्वे, पापुआ न्यू गुनिया

गट क - इंग्लंड,कॅनडा,बांगलादेश,नाम्बिया

गट ड - पाकिस्तान,श्रीलंका,अफगाणिस्तान,आयर्लंड

First published: August 18, 2017, 10:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading