मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Video: आज रात्री, दुबईत रंगणार थरार, ICC कडून INDvsPAK सामन्याचा प्रोमो व्हायरल

Video: आज रात्री, दुबईत रंगणार थरार, ICC कडून INDvsPAK सामन्याचा प्रोमो व्हायरल

INDvsPAk

INDvsPAk

भारत-पाकिस्तान (T20 World Cup, INDvsPAK) सामना सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. अशातच, आयसीसीनेदेखील (ICC) या सामन्यासाठी मोठी उत्सुकता दाखवली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

दुबई, 23 ऑक्टोबर : भारत-पाकिस्तान (T20 World Cup, INDvsPAK) सामना सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास उरले असतानाच कट्टर प्रतिद्वंद्वी असलेल्या या सामन्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. अशातच, आयसीसीनेदेखील (ICC) या सामन्यासाठी मोठी उत्सुकता दाखवली आहे. काही तासांपूर्वी उभय संघातील जुन्या क्षणचित्रांनी भरलेला व्हिडिओ शेअर करत सायंकाळी 70.30 वाजता रंगणाऱ्या सामन्याच थरार दाखवला आहे.

दोन्ही देशातील टीम एका मोठ्या गॅपनंतर आमने सामने येणार आहेत. या सामन्याची क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या खास सामन्यापूर्वी आयसीसीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आजवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी20 विश्वचषक सामन्यांतील काही क्षण दाखवण्यात आले आहेत. 58 सेकंदांच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर शेअर करत आयसीसीने आकर्षक असे कॅप्शनदेखील दिले आहे.

‘संपूर्ण जग आज होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहतो आहे. आज रात्री दुबईमध्ये हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत,’ असे आयसीसीने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. आयसीसीने शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे चाहत्यांच्या भारत-पाकिस्तान सामन्याशी जोडलेल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. याबरोबर तापलेल्या वातावरणात आणखी भर पडली आहे.

काही दिवसापूर्वी, “नवा मौका मौका..नवी ऑफर..एक खरेदी करा एक मोफत मिळवा”, असं स्टार स्पोर्टने ट्वीट करत एस व्हिडीओ शेअर केला होता. यापूर्वी आयसीसी वर्ल्डकप २०१९ भारत पाकिस्तान सामन्यापूर्वीचेही काही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.

टीम इंडियाने 2007 पासून टी-20 वर्ल्डकप जिंकलेला नाही. दुसरीकडे पाच वेळा वनडे वर्ल्डकप जेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. स्पर्धेचा हा सातवा हंगाम असून वेस्ट इंडिज स्पर्धेचा गतविजेता आहे आणि त्याने दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड हे देखील प्रत्येकी एकदा वर्ल्डकप जिंकण्यात यशस्वी झाले आहेत.

First published:

Tags: India vs Pakistan, T20 cricket, T20 league, T20 world cup