ICC ने सचिनला केलं ट्रोल, मास्टर ब्लास्टरने मारला सिक्सर

सचिनने नो बॉल टाकला म्हणून आयसीसीने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यावर सचिनने खिलाडुवृत्तीने उत्तर देत आयसीसीच्या बाउन्सरवर षटकार मारला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 15, 2019 04:40 PM IST

ICC ने सचिनला केलं ट्रोल, मास्टर ब्लास्टरने मारला सिक्सर

मुंबई, 15 मे :भारताचा माजी क्रिकेटपटू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानलं जातं. त्याचे मैदानावरील किस्से आजही प्रसिद्ध आहेत. पंच स्टीव बकनर आणि सचिन तेंडुलकर यांच्यात तर विळ्या भोपळ्यासारखं सख्य होतं. अनेकदा पंच म्हणून स्टीव बकनर यांच्या चुकीचा फटका सचिनला बसला आहे. आयपीएलमध्ये पंचांच्या चुकीनंतर खेळाडू भडकलेले पहायला मिळाले. मात्र, सचिनने कधीच पंचाच्या निर्णयाला आव्हान दिलं नाही.

काही दिवसांपूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विनोद कांबळीसोबतचा नेटमध्ये सराव करत असलेला फोटो व्हिडिओ शेअर केला होता. या फोटोवरून ट्रोल करण्यासाठी आयसीसीने स्टीव बकनर आणि सचिनचा फोटो शेअर केला आहे. यात स्टीव बकनर यांनी नो बॉलचा इशारा देत असलेला फोटो आहे. यावर पहिल्यांदा पायाकडे लक्ष दे असा कॅप्शन दिला आहे. सचिनला ट्रोल करण्याचा हा प्रयत्न खुद्द सचिननेच हाणून पाडला. त्याने यावेळीही खिलाडुवृत्तीने पंचांचा निर्णय मान्य आहे असं म्हटलं आहे.आयसीसीच्या ट्विटवर सचिनने म्हटंल आहे की, निदान यावेळी तरी मी फलंदाजी नाही तर गोलंदाजी करतो. पंचांचा निर्णय अंतिम असून तो मान्य असल्याचंही सचिनने म्हटंल आहे. सचिनने शेअऱ केलेल्या व्हिडीओत सचिन विनोद कांबळीला गोलंदाजी करतो. यात सचिनचा पाय रेषेच्या पुढे पडल्याचंही दिसतं. आय़सीसीने याच व्हिडीओवरून सचिनला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

Loading...
वाचा : दोन धावा का घेता आल्या नाही, शार्दुलने केला चेन्नईच्या पराभवाचा खुलासा


VIDEO: जनता होरपळतेय दुष्काळात, मंत्री सदाभाऊ खोत ACच्या गार वाऱ्यात!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 15, 2019 04:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...