Home /News /sport /

...तर विराट-रोहितला कधीच मिळणार नाही Olympic गोल्ड मेडल

...तर विराट-रोहितला कधीच मिळणार नाही Olympic गोल्ड मेडल

विराट-रोहितला मिळणार नाही ऑलिम्पिक मेडल

विराट-रोहितला मिळणार नाही ऑलिम्पिक मेडल

भारतीय क्रिकेट चाहत्यांना मंगळवारी खूशखबर मिळाली. 2028 लॉस एन्जेलिस ऑलिम्पिकमध्ये (Los Angeles Olympic 2028) क्रिकेटचा (Cricket) सहभाग असावा, यासाठी आयसीसी (ICC) प्रयत्न करणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोघांना मात्र ऑलिम्पिक मेडल मिळवता येणार नाही.

पुढे वाचा ...
    मुंबई, 10 ऑगस्ट : भारतीय क्रिकेट चाहत्यांना मंगळवारी खूशखबर मिळाली. 2028 लॉस एन्जेलिस ऑलिम्पिकमध्ये (Los Angeles Olympic 2028)  क्रिकेटचा (Cricket) सहभाग असावा, यासाठी आयसीसी (ICC) प्रयत्न करणार आहे. भारतीय क्रिकेट रसिकांनी आयसीसीच्या या पावलाचं स्वागत केलं असलं, तरी चाहत्यांना आपले हिरो मेडल घेताना पाहता येणार नाही. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे दोन्ही खेळाडू सध्या भारतीय क्रिकेटच्या शिखरावर आहेत. या दोन्ही खेळाडूंचं फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. खेळातल्या सगळ्यात मोठ्या स्पर्धेत आपला विजय व्हावा हे प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं, त्यामुळे आपल्या करियरमध्ये एक तरी वर्ल्ड कप जिंकावा असं प्रत्येक खेळाडूला वाटतं. चाहत्यांनाही आपल्या आवडत्या क्रिकेटपटूच्या हातात वर्ल्ड कपची ट्रॉफी असावी, असं वाटतं. क्रिकेटमध्ये जसं वर्ल्ड कपला स्थान आहे, तसंच इतर खेळांमध्ये ऑलिम्पिक गोल्ड मेडलचं महत्त्व आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या महान खेळाडूंना मात्र ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल जिंकता येणार नाही. विराट कोहली सध्या 32 वर्षांचा तर रोहित शर्मा 34 वर्षांचा आहे. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला तरी त्याला 2028 उजाडेल. 2028 ला विराटचं वय 39 आणि रोहितचं वय 41 वर्ष असेल. या वयात दोघांनीही क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल, त्यामुळे दोघांनाही भारताला गोल्ड मेडल जिंकवून देता येणार नाही. बीसीसीआयने (BCCI) 2028 ऑलिम्पिकसाठी पुरुष आणि महिला टीम पाठवण्याला एप्रिल महिन्यात परवानगी दिली, तेव्हापासून लॉस एन्जेलिस 2028 ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी प्रस्ताव पाठवण्याचा आयसीसीचा मार्ग मोकळा झाला. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, रिकी पॉण्टिंग यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूंनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या आयसीसीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. बीसीसीआयने याआधी क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाला विरोध केला होता. आता बीसीसीआयचा विरोध मावळला आहे. लॉस एन्जेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठीची प्रक्रिया 2022 च्या मध्यात सुरू होईल. यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) 2023 मध्ये याबाबतचा निर्णय घेईल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Olympic, Rohit sharma, Virat kohli

    पुढील बातम्या