Home /News /sport /

ICC कसोटी क्रिकेटमध्ये आणणार नवा ट्विस्ट, बदलणार 142 वर्षांपूर्वीचा नियम

ICC कसोटी क्रिकेटमध्ये आणणार नवा ट्विस्ट, बदलणार 142 वर्षांपूर्वीचा नियम

नववर्षात कसोटी क्रिकेटच्या सर्वात जुन्या नियमांत होणार बदल. असा असेल नवा नियम.

    दुबई, 30 डिसेंबर : एक काळ असा होता जेव्हा कसोटी सामने अनिर्णित राहायचे. 5 दिवस सामने होऊनही या सामन्यांचा निकाल लागत नसे मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. आता जवळपास प्रत्येक सामन्याचा निकाल कसोटी क्रिकेटमध्ये लागतो. फार मोजके सामने अनिर्णीत राहतात. इतकेच नाही तर आता कसोटी सामने हे पाच दिवसांआधीच संपतात. हा ट्रेंड पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं (आयसीसी) मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसी कसोटी सामन्यातील सर्वात महत्त्वाचा नियम बदलणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेने 4 दिवसांच्या कसोटी सामन्यासाठी आयसीसीने 2 वर्षांपूर्वी 2017मध्ये चार दिवसीय कसोटी सामन्यास परवानगी दिली होती. हा कसोटी सामना दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळला गेला. हा सामना अवघ्या 2 दिवसात संपला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना डाव आणि 120 धावांनी जिंकला. वाचा-लेकीनेच घेतला ‘दादा’शी पंगा! गांगुलीच्या जखमांवर मीठ चोळत केलं ट्रोल चार दिवसांचे होणार कसोटी सामने 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद जगातील सर्व बोर्डाच्या अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक घेणार आहेत. यामध्ये कसोटी सामन्यांचे दिवस कमी करण्याचा विचार केला जाणार आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, या बैठकीत चर्चा होईल की 2023पासून होणाऱ्या टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये कसोटी सामने हे 5 दिवसांचे नसून 4 दिवसांचे होणार आहेत. तथापि, जगभरातील क्रिकेटपटू आयसीसीच्या या प्रस्तावाला विरोध करू शकतात. वाचा-…आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणाला ‘जय श्रीराम’, VIDEO VIRAL कसोटी सामन्यांच्या संख्येत होणार वाढ जर कसोटी सामने चार दिवसांचे असतील आणि 2015 ते 2023च्या क्रिकेट वेळापत्रकानुसार सामने झाल्यास इतर क्रिकेट बोर्डाकडे 335 शिल्लक राहतील. या शिल्लक दिवसांमध्ये आणखी कसोटी सामने खेळले जाऊ शकतात. तसे, जर कसोटी सामने 4 दिवस केले तर एका दिवसात 90 ऐवजी 98 षटके टाकली जातील. मुख्य म्हणजे 2018पासून आतापर्यंत 60 टक्के सामने हे चार दिवसांआधीच संपले आहेत. त्यामुळंचे आयसीसीच्या वतीनं हा विचार करण्यात आला आहे. वाचा-टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला मोठा झटका, भुवनेश्वर कुमारला झाला गंभीर आजार
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Test cricket

    पुढील बातम्या