ICC Test Ranking : रॅंकिंगमध्ये टीम इंडिया जिंकली पण विराट हरला! अव्वलस्थानी पोहचला 'हा' खेळाडू

ICC Test Ranking : रॅंकिंगमध्ये टीम इंडिया जिंकली पण विराट हरला! अव्वलस्थानी पोहचला 'हा' खेळाडू

वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या विराट कोहलीला एक मोठा धक्का बसला आहे.

  • Share this:

जमैका, 03 सप्टेंबर : भारत-वेस्ट इंडिज दौराच विराट सेनेनं आपल्या खिशात घातला. याआधी टी-20, एकदिवसीय मालिकेनंतर कसोटी मालिकाही आपल्या खिशात घातली. याचबरोबर विराट भारताचा सर्वाधिक कसोटी जिंकणारा कर्णधार ठरला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा 28 वा विजय आहे. यामध्ये त्यानं भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलं आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 27 कसोटी जिंकल्या होत्या. परदेशात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सामने जिंकण्याच्याआधी विराट आता पहिल्या क्रमांकावर आहे.

मात्र, या सगळ्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या विराट कोहलीला एक मोठा धक्का बसला आहे. कर्णधार कोहलीनं या दौऱ्यावर ऐतिहासिक कामगिरी केली असली तरी, फलंदाजीमध्ये त्याला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यात तर पहिल्याच चेंडूवर विराट कोहली बाद झाला. त्याचा फटका त्याला कसोटी रॅकिंगमध्ये बसला आहे. सध्या आयसीसी कसोटी रॅकिंगमध्ये विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथनं मागे टाकले आहे.

वाचा-कसोटीत सर्वात यशस्वी कर्णधार झाला विराट, धोनीला मागे टाकल्यानंतर म्हणाला...

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथनं डिसेंबर 2015नंतर कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावरचा खेळाडू होता. त्यानंतर चेंडू कुडतरल्यामुळं एक वर्षांची बंदी स्मिथवर लावण्यात आली होती. त्यामुळं ऑगस्ट 2018मध्ये कोहलीनं स्मिथला मागे टाकत पहिला क्रमांका पटकावला. स्मिथनं इंग्लंडमध्ये होत असलेल्या अशस मालिकेत संघात पदार्पण केले. यावेळी पहिल्या कसोटी सामन्यात स्मिथनं शतकी खेळी केली. तर, दुसऱ्या कसोटी सामन्यात 92 धावा केल्या.

या कारणामुळं विराटला बसला मोठा फटका

विराट कोहलीचं कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येण्याचे मुख्य कारण जमैकामध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या चेंडूत बाद झाला हे आहे. पहिल्या डावात विराटनं अर्धशतक लगावले. त्यावेळी 76 धावा करत विराट बाद झाला. मात्र दुसऱ्या डावात कोहली शुन्यावर बाद झाला. त्यामुळं आयसीसीच्या ताज्या रॅकिंगनुसार विराट कोहलीचे 903 अंक आहेत. शुन्यावर बाद झाल्यामुळं विराटला 7 अंकांचा फटका बसला. तर, स्टिव्ह स्मिथचे 904 अकं आहेत.

वाचा-कसोटीच्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा धमाका, पाहा कोण कितव्या स्थानी

4 डावांत कोहलीनं केल्या 136 धावा

कर्णधार विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार झाला असला तरी, फलंदाजीमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. विराटनं दोन सामन्यातील चार डावांत केवळ 136 धावा केल्या. या कसोटी मालिकेत त्यानं 34च्या सरासरीनं धावा केल्या यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.

टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारत अव्वल

विंडीजविरुद्धची दोन कसोटीस सामन्यांची मालिका जिंकून भारतानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयी सुरुवात केली. या मालिका विजयासह चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात 120 गुणांसह भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. भारतानंतर दुसऱ्या स्थानावर न्यूझील़ंड आहे. लंकेविरुद्ध कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा एक विजय आणि एक पराभव झाला आहे. या दोन्हींचे प्रत्येकी 60 गुण झाले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अॅशेस मालिकेपासून सुरुवात झाली आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत तीन कसोटी सामने झाले. यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी एक सामना जिंकला तर एक अनिर्णित राहिला. यामुळे दोन्ही संघांचे प्रत्येकी 32 गुण झाले आहेत.

वाचा-विकेट मिळाल्यावर भडकले बुमराह आणि कोहली, प्रेक्षकांना दिला इशारा!

घोडागाडी शर्यतीत झाला अपघात, रस्ता सोडून लोकांमध्ये घुसले घोडे; थरारक VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: September 3, 2019, 3:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading