Home /News /sport /

ऋषभ पंतचा धमाका, धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं

ऋषभ पंतचा धमाका, धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं

गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या ऋषभ पंतने (Rishabh Pant) आणखी एक धमाका केला आहे. बुधवारी आयसीसीने टेस्ट क्रिकेटची नवी क्रमवारी (ICC Test Ranking) जाहीर केली. यातल्या बॅट्समनच्या यादीत टॉप-10 मध्ये विराट कोहलीसह ऋषभ पंत आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे.

पुढे वाचा ...
    दुबई, 5 मे : गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या ऋषभ पंतने (Rishabh Pant) आणखी एक धमाका केला आहे. बुधवारी आयसीसीने टेस्ट क्रिकेटची नवी क्रमवारी (ICC Test Ranking) जाहीर केली. यातल्या बॅट्समनच्या यादीत टॉप-10 मध्ये विराट कोहलीसह ऋषभ पंत आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे, ही त्याची सर्वोत्तम क्रमवारी आहे, याआधी पंत सातव्या क्रमांकावर होता. टीम इंडियाचा सर्वोत्तम कर्णधारापैकी एक असलेल्या एमएस धोनीला (MS Dhoni) टेस्ट क्रिकेटमध्ये एकदाही टॉप-10 बॅट्समनमध्ये येता आलं नव्हतं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याला तीन स्थानांचा फायदा झाल्यामुळे तो आता नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma), ऋषभ पंत आणि न्यूझीलंडचा हेन्री निकोलस या तिघांचे 747 पॉईंट्स असल्यामुळे ते संयुक्तरित्या सहाव्या क्रमांकावर आहेत. ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या 4 टेस्टमध्ये 280 रन केले होते, यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. या यादीत न्यूझीलंडचा केन विलियमसन (Kane Williamson) पहिल्या आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) दुसऱ्या, मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) तिसऱ्या, जो रूट चौथ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाच्या मधल्या फळीचे आधार असलेले चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांचं एक-एक स्थान नुकसान झालं आहे. पुजारा 14व्या आणि रहाणे 15व्या क्रमांकावर आहे. याशिवाय टॉप-20 मध्ये एकही भारतीय खेळाडू नाही. श्रीलंका टीमचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने हा 4 स्थान वर 11 व्या क्रमांकावर आला आहे. करुणारत्नेने मागच्या 4 टेस्टमध्ये 519 रन केले. यात बांगलादेशविरुद्ध द्विशतक आणि शतकाचा समावेश आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये बॉलर्सच्या यादीत आर.अश्विन दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. टॉप-10 मध्ये हा एकच भारतीय आहे. तर ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर आहे. बॉलर्स आणि ऑलराऊंडर्सच्या यादीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Icc, Rishabh pant, Team india

    पुढील बातम्या