ICC Test Rankings : टेस्ट रॅकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा डंका! पाहा कोण कोणत्या क्रमांकावर

ICC Test Rankings : टेस्ट रॅकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा डंका! पाहा कोण कोणत्या क्रमांकावर

विंडीजविरुद्धच्या पहिली कसोटी विजयामुळं भारतीय खेळाडूंच्या टेस्ट रॅकिंगमध्ये जबरदस्त फरक पडला आहे.

  • Share this:

अँटिगुआ, 27 ऑगस्ट : विंडीजविरुद्धची पहिली कसोटी भारताने चौथ्या दिवशी 318 धावांनी जिंकली. या विजयामुळं भारतीय खेळाडूंच्या टेस्ट रॅकिंगमध्ये जबरदस्त फरक पडला आहे. जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि इंग्लंडचा ऑलराऊंडर खेळाडू बेन स्टोक्स यांनी मोठी उडी घेतली आहे. बुमराहनं वेस्ट इंडिजनं विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात केवळ 7 धावा देत 6 विकेट घेतल्या. तर, स्टोक्सनं ऑस्ट्रेलिया विरोधात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात 538 धावांची अविश्वसनीय खेळी केली. त्याच्या जोरावर इंग्लंडनं एक विकेटनं सामना जिंकला.

जसप्रीत बुमराह आणि बेन स्टोक्स यांना या खेळीचे फळही मिळाली. आयसीसी रॅकिंगमध्ये स्टोक्स ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. तर, फलंदाजीमध्ये 13व्या स्थानी पोहचला आहे. तर बुमराहनं पहिल्यांदा पहिल्या दहा गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. बुमराहनं दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये पाच विकेट घेण्याची कामगिरी केली होती. तसेच, तीन मालिकेत अशी कामगिरी करणारा तो पहिला आशियाई गोलंदाज ठरला आहे. त्यामुळं बुमरानं 9 स्थानांची प्रगती करत 774 अंकांसह सातव्या स्थानावर उडी घेतली आहे.

वाचा-बुमराहच्या आऊट स्विंगनं केली कमाल! टेस्ट रॅकिंगमध्ये घेतली हनुमान उडी

अजिंक्य रहाणेला शतकी खेळीचा झाला फायदा

कसोटी उप-कर्णधार अजिंक्य रहाणेनं वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 81 तर दुसऱ्या डावात शतकी खेळी केली. तब्बल 2 वर्षांनी रहाणेनं केलेल्या शतकाचा त्याला फायदा झाला. त्यामुळं आयसीसी रॅकिंगमध्ये रहाणे 10व्या क्रमांकावर पोहचला आहे.

वाचा-भारताच्या माजी क्रिकेटपटूचं सोशल मीडियावर बनावट खातं, पोलिसांत तक्रार दाखल

गोलंदाजीमध्ये पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर

टेस्ट रॅकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर आहे. तर, इंग्लंडचा जोफ्रा आर्चर 40व्या स्थानावर पोहचला आहे. भारताचा जलद गोलंदाज इशांत शर्मा आता 12व्या स्थानी पोहचला आहे. तर रविंद्र जडेजानं दहाव्या क्रमांकावर आपले स्थान मिळवले आहे.

विरोट कोहली पहिल्या क्रमांकावर कायम

फलंदाजांमध्ये विराट कोहली कसोटी रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर, दुसऱ्या स्थानावर स्टिव्ह स्मिथ आहे. दरम्यान या दोघांमध्ये खुप कमी गुणांचा फरक आहे.

वाचा-शास्त्रींनी शेअर केला बीचवरचा PHOTO, सोशल मीडियावर झाले जबरदस्त ट्रोल

VIDEO : धावत्या रिक्षातून विद्यार्थी फेकला गेला बाहेर, तोच उठून पळाला मागे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 04:18 PM IST

ताज्या बातम्या