ICC Test Ranking : कसोटी रॅकिंगमध्ये विराटचा दबदबा, स्मिथला धोबीपछाड देत पुन्हा होणार किंग?

ICC Test Ranking : कसोटी रॅकिंगमध्ये विराटचा दबदबा, स्मिथला धोबीपछाड देत पुन्हा होणार किंग?

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आयसीसीच्या टेस्ट रॅंकिंगमध्ये मोठी उडी घेतली आहे.

  • Share this:

पुणे, 14 ऑक्टोबर : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आयसीसीच्या टेस्ट रॅंकिंगमध्ये मोठी उडी घेतली आहे. तब्बल एका वर्षानंतर द्विशतक आणि 10 महिन्यांनतर शतकी कामगिरी केल्याचा फायदा विराटला झाला. पुण्यात दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात विराटनं द्विशतकी कामगिरी केली. त्यामुळं आयसीसी कसोटी रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी विराटला फक्त दोन गुणांची आवश्यकता आहे.

पुण्यात भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं ताजी टेस्ट रॅकिंग जाहीर केली. या कसोटी रॅकिंगमध्ये विराटनं आपले दुसरे स्थान कायम ठेवले आहे. त्यामुळं आता विराटला पहिले स्थान मिळवण्यासाठी दोन गुणांची गरज आहे. दक्षिण आफ्रिका विरोधात दुहेरी शतक करत विराटनं 37 गुण मिळवले. दक्षिण आफ्रिका विरोधात विराटनं नाबाद 245 धावांची खेळी केली होती. त्यामुळं विराट पुन्हा 900 गुणांनी वरच्या स्थानी पोहचला आहे. दरम्यान पहिल्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथच्या खात्यात 937 अंक आहेत. तर विराट कोहली 936 अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळं भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात विराटकडे स्मिथला धोबीपछाड देण्याची संधी असणार आहे.

वाचा-कॅप्टन कोहलीचा स्पेशल रेकॉर्ड, 50वा कसोटी सामना ठरला खास

गोलंदाजीमध्ये अश्विनला झाला फायदा

तर, गोलंदाजीमध्ये आपल्या फिरकीच्या जाळ्यात आफ्रिकेला अडकवणाऱ्या अश्विनला कसोटी रॅकिंगमध्ये फायदा झाला आहे. अश्विनलाही या सामन्यानंतर मोठा फायदा झाला आहे. आर. अश्विन आता दहाव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर पोहचला आहे. मात्र रवींद्र जडेजाला मात्र विशेष फायदा झाला नाही.

वाचा-मालिका विजयानंतरही विराटनं आफ्रिकेला दिलं ओपन चॅलेंज, म्हणाला...

विराटच्या नेतृत्वाखाली 8व्यांदा मिळवला एका डावानं विजय

कर्णधार म्हणून हा सामना विराटचा 50वा सामना होता. 50 कसोटी सामन्यात विराटनं तबब्ल आठव्यांदा एका डावानं विजय मिळवला आहे. याआधी भारताकडून माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी अशी कमाल केली होती. यासह विराटनं सौव गांगुलीचा विक्रम मोडला आहे. गांगुलीनं तब्बल 7वेळा एका डावानं विजय मिळवला आहे. तर, धोनीनं नव्यांदा अशी कामगिरी केली. आता विराट आणि अझरुद्दीन संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

वाचा-कार्तिक होणार 'बेस्ट फिनिशर', तुफान फटकेबाजीने गोलंदाजांना घाम

VIDEO : विधानसभा निवडणुकीत वंचितचं भविष्य काय? रामदास आठवले म्हणाले...

Published by: Priyanka Gawde
First published: October 14, 2019, 4:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading