ICC Test Ranking : रोहित शर्माचा ICC रॅकिंगमध्येही जलवा, पहिल्यांदाच केली 'दस नंबरी' कामगिरी

ICC Test Ranking : रोहित शर्माचा ICC रॅकिंगमध्येही जलवा, पहिल्यांदाच केली 'दस नंबरी' कामगिरी

दक्षिण आफ्रिका विरोधात रोहितनं 529 धावा करत सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार मिळवला.

  • Share this:

मुंबई, 23 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत सर्वात जास्त चर्चा झाली ती रोहित शर्माच्या फलंदाजीची. रोहित शर्मानं या स्पर्धेत सर्वात जास्त धावा करण्याची कामगिरी करत तिसऱ्या कसोटी सामन्यात आपले पहिले द्विशतकही पूर्ण केले. पहिल्यांदाच कसोटीमध्ये सलामीला फलंदाजी करत रोहितनं शानदार कामगिरी केली.

दक्षिण आफ्रिका विरोधात रोहितनं 529 धावा करत सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार मिळवला. दरम्यान आता आयसीसी कसोटी रॅकिंगमध्ये रोहित टॉप-10 फलंदाजांमध्ये सामिल झाला आहे. आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी यादीमध्ये रोहित पहिल्यादा 10व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. रोहित शर्मानं या मालिकेत विक्रमी कामगिरी करत 722 गुण मिळवले आहेत. याशिवाय अजिंक्य रहाणेही 751 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आला आहे. तर, भारताचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

वाचा-एका षटकात 17 चेंडू टाकणाऱ्या क्रिकेटपटूची निवृत्ती, धोनीने दिली होती संधी!

वाचा-सामन्याआधी देश सोडून पाकिस्तानात गेला क्रिकेटपटू, संघ सहकारी बसले शोधत!

डॉन ब्रॅडमन यांनांही टाकले मागे

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत 212 धावांची खेळी करत द्विशतक साजरं केलं. यासह त्यानं मायदेशात सर्वाधिक सरासरीने धावा करण्याचा डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मागे टाकला आहे. रोहित शर्माने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत तीन शतकं केली आहेत. भारतीय मैदानावर त्यानं 12 वी कसोटी खेळताना 99.84 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. कमीत कमी दहा कसोटी खेळलेल्या खेळाडूंमध्ये ही सर्वाधिक सरासरी आहे. रोहितनं ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकलं आहे. डॉन ब्रॅडमन यांनी त्यांच्या कारकिर्दीत 33 कसोटीमध्ये 50 डावात 98.22 च्या सरासरीने 4 हजार 322 धावा केल्या होत्या. रोहित शर्माने 12 कसोटीत 98.22 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

वाचा-BCCI च्या बरखास्त प्रशासकीय समितीच्या सदस्यांना मिळणार इतके कोटी!

तिन्ही फॉरमॅटमध्ये द्विशतकी कामगिरी

रोहित शर्मा हा भारताकडून क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक साजरं करणारा पहिला सलामीवीर ठरला आहे. तर सलामीवीर म्हणून खेळताना पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शॉ यांनी अशी कामगिरी केली आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये शतक करणारा रोहित शर्मा भारताचा पहिला सलामीवीर ठरला आहे. रोहितने कसोटी पदार्पणातही शतक साजरं केलं होतं. याशिवाय गेल्या दहा वर्षांत शतक साजरं करताना चार षटकार मारणारा रोहित शर्मा भारताचा पहिलाच सलामीवीर ठरला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 23, 2019, 2:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading