मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC Final मध्ये पराभव, तरी टीम इंडियाचा खेळाडू पोहोचला पहिल्या क्रमांकावर

WTC Final मध्ये पराभव, तरी टीम इंडियाचा खेळाडू पोहोचला पहिल्या क्रमांकावर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाला (Team India) पराभवाचा धक्का बसला, पण तरीही टीम इंडियासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाला (Team India) पराभवाचा धक्का बसला, पण तरीही टीम इंडियासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाला (Team India) पराभवाचा धक्का बसला, पण तरीही टीम इंडियासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.

साऊथम्पटन, 24 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाला (Team India) पराभवाचा धक्का बसला, पण तरीही टीम इंडियासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. आयसीसीने (ICC Test Rankings) जाहीर केलेल्या नव्या टेस्ट क्रमवारीमध्ये रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) पहिल्या क्रमांकाचा ऑलराऊंडर बनला आहे. त्याने वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डरला (Jason Holder) पिछाडीवर टाकलं आहे. होल्डरच्या खात्यात 384 रेटिंग पॉईंट्स आहेत. इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याच्याकडे 377 पॉईंट्स आहेत. या यादीत भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन (R Ashwin) चौथ्या क्रमांकावर आहे. अश्विनने 353 पॉईंट्स कमावले आहेत.

जडेजा याआधी 17 ऑगस्ट 2017 साली टेस्ट क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आला होता, त्यावेळी जडेजाच्या खात्यात 884 पॉईंट्स होते, त्यावेळी अश्विनही तिसऱ्या क्रमांकावर होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये या दोघांचीही टीम इंडियात निवड झाली होती. या सामन्यात अश्विनने एकूण 4 विकेट तर जडेजाने 1 विकेट घेतली, तर बॅटिंगमध्ये अश्विनने 22 आणि 7 रन, जडेजाने 15 आणि 16 रन केले.

आयसीसीच्या टेस्ट बॉलरच्या क्रमवारीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स (Pat Cummins) पहिल्या क्रमांकावर कायम आहे. कमिन्सकडे 908 पॉईंट्स आणि अश्विनकडे 850 पॉईंट्स आहेत. टेस्ट बॉलरमध्ये दुसरा कोणताही भारतीय टॉप-10 मध्ये नाही. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर टीम साऊदी (Tim Southee) तिसऱ्या क्रमांकावर आणि नील वॅगनर (Neil Wagner) पाचव्या क्रमांकावर आहे.

बॅट्समनच्या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) चौथ्या क्रमांकावर आहे. विराटच्या खात्यात 814 पॉईंट्स आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) बॅट्समनच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकचं (Quinton De Kock) टॉप-10 मध्ये पुनरागमन झालं आहे. डिकॉकने वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये धमाकेदार बॅटिंग केली, ज्याचा त्याला फायदा झाला.

First published:

Tags: Cricket news, Ravindra jadeja, Team india