ICC Test Ranking : जागतिक क्रिकेटमधील ऐतिहासिक घटना, 12 सामन्यात भारतीय क्रिकेटपटू पोहचला तिसऱ्या स्थानी

ICC Test Ranking : जागतिक क्रिकेटमधील ऐतिहासिक घटना, 12 सामन्यात भारतीय क्रिकेटपटू पोहचला तिसऱ्या स्थानी

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका विराट सेनेनं 2-0नं खिशात घातली.

  • Share this:

जमैका, 03 सप्टेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका विराट सेनेनं 2-0नं खिशात घातली. यात भारतीय संघाचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहनं महत्त्वाची भुमिका बजावली. दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात बुमराहनं वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. कसोटी क्रिकेटमध्ये पहिली हॅट्ट्रिक घेत, भारताला आघाडी मिळवून दिली. त्यामुळं आयसीससी रॅकिंगमध्येही बुमराहला फायदा झाला आहे. आयसीसीच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या कसोटी गोलंदाजांच्या यादीत बुमराहनं थेट तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. बुमराहनं वेस्ट इंडिजनं विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात केवळ 7 धावा देत 6 विकेट घेतल्या होत्या.

बुमराहनं विंडिज विरोधात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातच टेस्ट क्रिकेटमध्ये आपल्या 50 विकेट पूर्ण केल्या. त्याचबरोबर सर्वात जलद 50 विकेट मिळवणारा पहिला भारतीय गोलंदाज बुमराह ठरला होता. जानेवारी 2018मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या बुमराहनं 12 सामन्यातच 62 विकेट घेतल्या आहेत.

वाचा-बुमराहच्या हॅट्ट्रिकचा खरा हिरो ठरला विराट! एका निर्णयानं घडला इतिहास

विंडिज विरोधात बुमराहनं केवळ 2 कसोटी सामन्यातच 13 विकेट घेतल्या. पहिल्या सामन्यात 7 धावा देत 6 तर दुसऱ्या सामन्यात हॅट्ट्रिक घेण्यात अभूतूपूर्व कामगिरी केली. यामुळं आयसीसी रॅकिंगमध्ये जसप्रीत बुमराह 835 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. बुमराह ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज पॅट कमिन्स आणि दक्षिण आफ्रिकेचा कगिरो रबाडा यांच्या मागे आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणार तिसरा गोलंदाज

वेस्ट इंडिज विरोधात बुमराहनं कारकिर्दीतील पहिली हॅट्ट्रिक केली. बुमराहनं 9.1 षटके गोलंदाजी करताना 3 षटके निर्धाव टाकली. त्यानं 16 धावा देत विंडीजचे 6 फलंदाज तंबूत धाडले. बुमराहच्या आधी भारताकडून हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी अशी कामगिरी केली आहे. हरभजन सिंगने 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर इरफान पठाणने पाकिस्तानविरुद्ध 2006 मध्ये अशी कामगिरी केली होती.

वाचा-रॅंकिंगमध्ये टीम इंडिया जिंकली पण विराट हरला! अव्वलस्थानी पोहचला 'हा' खेळाडू

बुमरहाच्या हॅट्ट्रिकचा खरा हिरो होता विराट

भारतानं दिलेल्या 416 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या डावात बुमराहनं 9व्या ओव्हरमध्ये दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर बुमराहला विकेट मिळाली. दुसऱ्या चेंडूवर डॅरेन ब्राव्होला राहुलच्या हाती झेल देत बाद केले. तर तिसऱ्या चेंडूवर ब्रुक्सला एलबीडब्लू करत बाद केले. चौथा चेंडू बुमराहसाठी हॅट्ट्रिक चेंडू होता. चौथा चेंडू रोस्टन चेजच्या पायाला लागला. मात्र अम्पायरनं नाबाद दिले, बुमराहनेही जोरात अपील केले नाही. त्याला वाटले हा चेंडू बॅटवर लागला आहे. मात्र कर्णधार विराट कोहलीच्या डोक्यात वेगळेच विचार होता. त्यानं डीआरएस घेण्याची मागणी केली. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी चेजला बाद घोषित केले.

वाचा-विकेट मिळाल्यावर भडकले बुमराह आणि कोहली, प्रेक्षकांना दिला इशारा!

घोडागाडी शर्यतीत झाला अपघात, रस्ता सोडून लोकांमध्ये घुसले घोडे; थरारक VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: September 3, 2019, 4:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading