Home /News /sport /

ICC Test Ranking : विराट-जडेजाला धक्का, बुमराहचा सॉलिड सिक्स!

ICC Test Ranking : विराट-जडेजाला धक्का, बुमराहचा सॉलिड सिक्स!

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या टेस्ट सीरिजनंतर आयसीसीने नव्या टेस्ट क्रमवारीची (ICC Test Ranking) घोषणा केली आहे. या क्रमवारीत जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) 6 स्थानांचा फायदा झाला आहे.

    दुबई, 16 मार्च : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या टेस्ट सीरिजनंतर आयसीसीने नव्या टेस्ट क्रमवारीची (ICC Test Ranking) घोषणा केली आहे. या क्रमवारीत जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) 6 स्थानांचा फायदा झाला आहे, ज्यामुळे तो सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर विराट कोहलीला (Virat Kohli) चार स्थानांचं नुकसान झालं आहे. विराट आता बॅटरच्या क्रमवारीत नवव्या क्रमांकावर आहे. गेल्या काही काळापासून विराट संघर्ष करत आहे. नोव्हेंबर 2019 नंतर विराटला शतक करता आलं नाही, तसंच श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये पहिल्यांदाच विराटची टेस्ट सरासरी 50 पेक्षा खाली आली. मोहाली टेस्टमध्ये 175 रनची ऐतिहासिक खेळी करणाऱ्या रवींद्र जडेजालाही (Ravindra Jadeja) धक्का लागला आहे. ऑलराऊंडरच्या यादीत जडेजा पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. बँगलोर टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शतक करणारा श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याचाही आयसीसी क्रमवारीत फायदा झाला आहे. बुमराहने बॉलरच्या क्रमवारीत शाहीन आफ्रिदी, काईल जेमिसन, टीम साऊदी, नील वॅगनर, जॉश हेजलवूड आणि जेम्स अंडरसन यांना पिछाडीवर टाकलं. बँगलोर टेस्टमध्ये बुमराहने 8 विकेट घेतल्या. घरच्या मैदानात बुमराहला पहिल्यांदाच पाच विकेट मिळाल्या. या कामगिरीचा बुमराहच्या क्रमवारीमध्येही फायदा झाला. तर दुसरीकडे मोहम्मद शमी एक स्थान वरती 17व्या क्रमांकावर आला आहे. श्रीलंकेचा लसिथ एम्बुलडिनिया आणि जयविक्रमा यांना पाच स्थानांचा फायदा झाला आहे. एम्बुलडिनिया 32व्या आणि जयविक्रमा 45 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. बॉलरच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स पहिल्या, आर.अश्विन दुसऱ्या आणि कागिसो रबाडा तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणरत्ने करियरमधल्या सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. बाबर आझम आठव्या आणि विराट नवव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन पहिल्या क्रमांकावर कायम आहे. जो रूट दुसऱ्या, स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या आणि केन विलियमसन चौथ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजचा बूनर आणि भारताच्या श्रेयस अय्यर यांनी क्रमवारीत मोठी उडी घेतली आहे. बूनरला 22 आणि श्रेयस अय्यरला 40 स्थानांचा फायदा झाला. आता बूनर 22व्या आणि अय्यर 37व्या क्रमांकावर गेले आहेत. इंग्लंडविरुद्ध बूनरने 123 आणि नाबाद 38 रनची खेळी केली. तर अय्यरने दुसऱ्या टेस्टमध्ये 92 आणि 67 रन केले. इंग्लंडच्या झॅक क्राऊलीने 121 रन केले होते, ज्यामुळे त्याला 13 स्थानांचा फायदा झाला. तो आता 49 व्या क्रमांकावर आला आहे. होल्डर पहिल्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा स्टार ऑलराऊंडर पुन्हा एकदा ऑलराऊंडरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्याने रवींद्र जडेजाला पिछाडीवर टाकलं आहे. ऑलराऊंडरच्या यादीत जडेजा दुसऱ्या, अश्विन तिसऱ्या, शाकिब चौथ्या आणि स्टोक्स पाचव्या क्रमांकावर आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Icc, India Vs Sri lanka, Jasprit bumrah, Ravindra jadeja, Virat kohli

    पुढील बातम्या