दुबई, 25 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड यांच्यातली तिसरी टेस्ट (India vs England Third Test) सुरू व्हायच्या आधी क्रमवारीमध्ये (ICC Test Ranking) मोठे बदल झाले आहेत. भारताचा विकेट कीपर बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) क्रमवारीत एक स्थान खाली आला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) त्याला मागे टाकलं आहे. भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहदेखील (Jasprit Bumrah) टॉप-10 मधून बाहेर गेला आहे.
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान (West Indies vs Pakistan) यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टनंतर या क्रमवारीत बदल झाले. बाबर आझमने या टेस्टमध्ये 75 आणि 33 रनची खेळी केली, त्यामुळे तो एक स्थान वरती आला. 749 पॉईंट्ससह बाबर 8व्या क्रमांकावरून 7 व्या क्रमांकावर आला आहे. टॉप-10 बॅट्समनच्या क्रमवारीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
पाकिस्तानचा डावखुरा बॅट्समन फवाद आलमने (Fawad Alam) वेस्ट इंडिजविरुद्ध शतक केलं, त्यामुळे त्याला 34 स्थानांचा फायदा होत तो 21व्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा विकेटकीपर बॅट्समन मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) पुन्हा एकदा टॉप-10 मध्ये जागा पटकावली आहे. 31 आणि नाबाद 10 रनची खेळी केल्यानंतर रिझवान 19व्या क्रमांकावर आला आहे.
शाहीन आफ्रिदीची सर्वोत्तम क्रमवारी
पाकिस्तानचा डावखुरा फास्ट बॉलर शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये 10 विकेट घेतल्या, त्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. आयसीसी टेस्ट क्रमवारीमध्येही आफ्रिदीला 10 स्थानांचा फायदा झाला आहे. आफ्रिदीच्या या कामगिरीमुळे बुमराहचं नुकसान झालं आहे. बुमराह 10व्या क्रमांकावरून 11 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर आफ्रिदी 8 व्या क्रमांकावर आला आहे.
बॅट्समनच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) 901 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) दुसऱ्या, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) तिसऱ्या, ऑस्ट्रेलियाचाच मार्नस लाबुशेन चौथ्या, भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पाचव्या आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) सहाव्या क्रमांकावर आहे.
बॉलिंग क्रमवारीत भारताचा आर.अश्विन (R Ashwin) हा एकमेव बॉलर टॉप-10 मध्ये आहे. 848 पॉईंट्ससह अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स (Pat Cummins) पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Icc, Team india