पुणे, 09 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका होत आहे. यातील पहिला सामना भारतानं 203 धावांनी जिंकला. दरम्यान या विजयासह भारतानं आयसीसीच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल क्रमांक कायम ठेवले आहे. वेस्ट इंडिज विरोधात मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आता आफ्रिकाची शिकार करण्यास सज्ज आहे. या विजयासह भारतानं ICC Test Championshipमध्ये 160 गुण मिळवले आहेत.
मात्र, भारत अव्वल क्रमांकवर असला तरी, विराट आयसीसीवर नाराज आहे. कारण या स्पर्धेच्या नियमानुसार मालिका विजय मिळवलेल्या संघाला 120 अंक देण्यात येतात. मग मालिका पाच सामन्यांची असो किंवा दोन. तसेच, सामना मायदेशात किंवा परदेशात झाला तरी, गुणांची विभाजनी समान आहे. याबाबत खंत व्यक्त करताना विराटनं, “ जर मला गुणांची विभागणी किंवा गुणतालिका तयार करण्यास सांगितले तर, मी विदेशात झालेल्या सामन्यांना जास्त गुण देईन. कारण पहिल्या सत्रात झालेले बदल पाहणे जास्त औत्सुक्याचे असेल. भारतीय संघ 160 गुणांसह अव्वल स्थानावर आहे तर वेस्ट इंडिजला 2-0नं नमवत भारतानं 120 गुण मिळवले आहेत.
याशिवाय, दुसऱ्या कसोटी मालिकेत विजय टीम इंडियायाच होणार असा विश्वासही त्याने व्यक्त केला. 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात दुसरी कसोटी खेळण्यात येणार आहे.
गुणतालिकेत 60 गुणांसह दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा संघ आहे. तर, 60 गुणांसह श्रीलंकेचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर 56 गुणांसह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. तर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि पाकिस्तान यांनाही एकही गुण अद्याप मिळवता आलेला नाही.
वाचा-टी-20 वर्ल्ड कपआधी धोक्याची घंटा, हुकुमी खेळाडूंची दुखापत संघासाठी डोकेदुखी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये काय आहे
एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्ड कपच्या धर्तीवर पहिल्यांदाच टेस्ट चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. यात एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्ड कप प्रमाणे खेळाडूंच्या जर्सीवर त्यांचे नाव आणि जर्सी नंबर असणार आहे. याआधी कसोटी क्रिकेटमध्ये पांढऱ्या रंगाच्या जर्सीचा वापर केला जात होता.
वाचा-IND vs SA : टीम इंडियाला पुण्यात इतिहास घडवण्याची संधी, करणार विश्वविक्रम?
असे आहेत टेस्ट चॅम्पियनशीपचे नियम
या स्पर्धेत आयसीसी क्रमवारीत असलेल्या टॉप 9 संघांना खेळण्याची संधी मिळणार आहे. यात संघ आपले प्रतिस्पर्धी संघ स्वतः निवडतील. संघांना दोन कसोटी सामने खेळणे अनिवार्य आहे. यात तीन मालिका घरच्या मैदानावर होणार आहेत. मालिका 2 ते 5 सामन्यांची असू शकते. यात प्रत्येक सामन्यात जिंकणाऱ्या संघाला 120 गुण मिळणार आहेत. दरम्यान गुण हे प्रत्येक सामन्यावर दिले जातील, मालिकेवर असणार नाही.
वाचा-IND vs SA : पुण्यातील कसोटी सामन्यावर संकट; दोन्ही संघांना बसू शकतो मोठा फटका!
उधळलेल्या गायीचा तरुणावर हल्ला, पायांमध्ये पकडून केली कोंडी VIDEO VIRAL