ICC Test Championship Point Table : कसोटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया ‘बिग बॉस’, इतर संघांची अवस्था दयनीय!

भारतानं आयसीसी टेस्ट चॅम्पिनयशीप स्पर्धेत भारतानं सलग चौथा विजय मिळवला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2019 04:21 PM IST

ICC Test Championship Point Table : कसोटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया ‘बिग बॉस’, इतर संघांची अवस्था दयनीय!

पुणे, 13 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्यांदा ऐतिहासिक फॉलोऑन सामन्यात भारतानं विजय मिळवला. भारतीय संघानं विराट कोहलीच्य नेतृत्वाखाली पुण्यातील कसोटी मालिकेत विजय मिळवत मालिकेवर कब्जा केल आहे. भारतानं तीन कसोटी सामन्यांची मालिका 2-0नं आपल्या नावावर केली आहे. भारतानं दुसरा सामना एक डाव आणि 137 धावांनी जिंकला. भारताची दक्षिण आफ्रिका विरोधातला हा सर्वात मोठा विजय आहे.

भारतानं आयसीसी टेस्ट चॅम्पिनयशीप स्पर्धेत भारतानं सलग चौथा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताल 40 गुण मिळाले आहे. त्यामुळं भारताचे आता 200 अंक झाले आहेत. या गुणतालिकेत 200 अंक मिळवणारा भारत पहिला संघ ठरला आहे. भारतानं दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात 67.2 ओव्हरमध्ये 189 धावांवर बाद केले. याचबरोबर दुसऱ्या कसोटी सामन्यात 137 धावांनी विजय मिळवला आहे.

वाचा-टीम इंडिया कसोटीचा बादशाह, आफ्रिकेविरुद्धच्या विजयानं ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड!

टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Loading...

भारतानं दक्षिण आफ्रिकेला नमवत घरच्या मैदानात 11व्या कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. अशी कामगिरी करणारा टीम इंडिया पहिला संघ ठरला आहे. टीम इंडियाच्या घरच्या मैदानात कसोटी मालिकेच्या विजयाचा प्रवास हा 2015-2016मध्या झाला होता. त्यानंतर 2016-17मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया संघाला नमवलं. त्यानंतर 2018मध्ये श्रीलंकेविरोधात तर, 2018मध्ये अफगाणिस्तानविरोधात मलिका विजय मिळवला होता. 2013पासून टीम इंडियानं एकही सामना गमावलेला नाही. याआधी स्टिव्ह वॉ आणि मार्क टेलरच्या नेतृत्वाखाली क वेळा तर रिकी पॉंटिंगच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा हा पराक्रम केला होता.

वाचा-भारताचा विराट विजय, दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि 137 धावांनी चारली धूळ

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये काय आहे

एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्ड कपच्या धर्तीवर पहिल्यांदाच टेस्ट चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. यात एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्ड कप प्रमाणे खेळाडूंच्या जर्सीवर त्यांचे नाव आणि जर्सी नंबर असणार आहे. याआधी कसोटी क्रिकेटमध्ये पांढऱ्या रंगाच्या जर्सीचा वापर केला जात होता.

असे आहेत टेस्ट चॅम्पियनशीपचे नियम

या स्पर्धेत आयसीसी क्रमवारीत असलेल्या टॉप 9 संघांना खेळण्याची संधी मिळणार आहे. यात संघ आपले प्रतिस्पर्धी संघ स्वतः निवडतील. संघांना दोन कसोटी सामने खेळणे अनिवार्य आहे. यात तीन मालिका घरच्या मैदानावर होणार आहेत. मालिका 2 ते 5 सामन्यांची असू शकते. यात प्रत्येक सामन्यात जिंकणाऱ्या संघाला 120 गुण मिळणार आहेत. दरम्यान गुण हे प्रत्येक सामन्यावर दिले जातील, मालिकेवर असणार नाही.

वाचा-जडेजाची जादू! अपील न करताच अम्पायरनं फलंदाजाला केले बाद, पाहा VIDEO

VIDEO : पंकजा मुंडेंच्या सभेदरम्यान गोंधळ; घोषणाबाजी करणारे आंदोलक ताब्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 04:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...