Home /News /sport /

ICC T20 World Cup: टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन भारतात नाही, 17 ऑक्टोबरपासून यूएईमध्ये टूर्नामेंट

ICC T20 World Cup: टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन भारतात नाही, 17 ऑक्टोबरपासून यूएईमध्ये टूर्नामेंट

ICC T20 World Cup: टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन भारतात होणार नाहीये. यूएई आणि ओमान येथे ही टूर्नामेंट खेळवली जाणार आहे.

    मुंबई, 25 जून: आयपीएल 2021 नंतर आता टी-20 वर्ल्ड कप (T-20 World Cup)चे आयोजन सुद्धा भारताबाहेर होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन हे भारताऐवजी यूएई (UAE) आणि ओमानमध्ये होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपची सुरुवात 17 ऑक्टोबर पासून होणार आहे. तर टूर्नामेंटची फायनल मॅच 14 नोव्हेंबर रोजी खेळली जाणार आहे. आयपीएल 2021 ची फायनल मॅच 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. म्हणजेच आयपीएल संपल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत टी-20 वर्ल्ड कप टूर्नामेंटची सुरुवात होणार आहे. (ICC T20 World Cup will start in UAE from October 17) ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, टी-20 वर्ल्ड कप दोन टप्प्यांत खेळवला जाणार आहे. पहिला टप्पा हा यूएईमध्ये आणि ओमानमध्ये आयोजित केला जाणार आहे. रिपोर्टनुसार, पहिल्या राऊंडमध्ये 1 ते 12 मॅचेस होतील ज्यामध्ये 8 टीम्समध्ये मॅच होतील. या 8 टीम्सपैकी 4 टीम्स सुपर 12 साठी क्वॉलिफाय होतील. WTC Final : ऋषभ पंतच्या आऊट होण्यावर गावसकर नाराज, म्हणाले... सुपर 12मध्ये एकूण 30 मॅचेस होतील. 24 ऑक्टोबर पासून या मॅचेसची सुरुवात होईल. सुपर 12 मधील टीम्सला 6-6 अशा दोन गटात विभागले जाईल. ज्यांच्या मॅचेस यूएईतील दुबई, अबूधाबी आणि शारजाह येथे खेळवल्या जातील. यानंतर दोन प्लेऑफ मॅचेस खेळवल्या जातील. सुपर 12 नंतर 3 प्लेऑफ मॅचेस खेळवल्या जातील. 2 सेमीफायनल आणि फायनल मॅचेस होतील. 1 जून रोजी आयसीसीने बीसीसीआयला टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजना संदर्भात निर्णय घेण्यासाठी जून अखेरपर्यंतची मुदत दिली होती. पण भारतातील कोरोनामुळे उद्भवलेली स्थिती पाहता टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करणे कठीण आहे. यासोबतच आयपीएल 2021चा दुसरा टप्पा सुद्धा यूएईमध्ये होत आहे. अशा परिस्थितीत टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी यूएई योग्य जागा मानली जाते.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: T20 world cup, Team india, UAE

    पुढील बातम्या