मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup मधला पहिला वाद, SL vs BAN सामन्यात मैदानात भिडले खेळाडू, VIDEO

T20 World Cup मधला पहिला वाद, SL vs BAN सामन्यात मैदानात भिडले खेळाडू, VIDEO

SL vs BAN

SL vs BAN

शारजाहच्या खेळपट्टीवर सुरु असलेल्या श्रीलंके विरुद्ध बांगलादेश (SL vs BAN)सामन्यात खेळाडू एकमेकांना भिडले. सध्या हा वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

दुबई, 23 ऑक्टोबर : टी 20 वर्ल्डकप (T20 World Cup) स्पर्धेतील सुपर-12 फेरीतील सामन्यांना 23 ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. काही तासातच दुबईच्या रणांगणात भारप पाकिस्तान भिडणार आहेत. तत्पूर्वी, शारजाहच्या खेळपट्टीवर सुरु असलेल्या श्रीलंके विरुद्ध बांगलादेश (SL vs BAN)सामन्यात खेळाडू एकमेकांना भिडले. सध्या हा वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रीलंकेनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, शारजाहच्या खेळपट्टीवर फलंदाजी करण्यासाी बांगलादेशचे खेळाडू उतरले. लिटन दास ( Liton Das) व मोहम्मद नईम यांनी बांगलादेशला दमदार सुरुवात करून दिली.

T20 World Cup : India जिंकणार का Pakistan? ज्योतिषी जगन्नाथ गुरूजींची भविष्यवाणी

लिटन दास व मोहम्मद नईम यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावताना संघाला पॉवरप्लेमध्ये ८च्या सरासरीनं धावा चोपून दिल्या. मात्र, 6 षटकास कुमाराच्या गोलंदाजीवर ड्राईव्ह मारताना लिटन दास झेलबाद झाला. आऊट झाल्याने लिटन दास पॅव्हेलियनमध्ये परतत होता. पण शेजारुन जाताना श्रीलंकेचा गोलंदाज लाहिरु कुमाराने लिटन दासला डिवचण्याचा प्रयत्न केला. दोघांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळली. त्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंसह अम्पायरनंही मध्यस्थी करता भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला.

सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, टी 20 वर्ल्डकप 2021 च्या स्पर्धेल पहिल्यांदाच गालबोट लागले आहे.

नईमनं 52 चेंडूंत 62 धावा केल्या आणि लिटन 16 धावांवर माघारी परतला. शाकिब अल हसनही ( 10) अपयशी ठरला. मुश्फीकुर रहिम दमदार फटकेबाजी करत आहे आणि बांगलादेशनं 17 षटकांत 140 धावा केल्या आहेत.

First published:

Tags: Sri lanka, T20 cricket, T20 league, T20 world cup