नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर: टीम इंडियानं अखेर टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup 2021) पहिला विजय मिळवला आहे. बुधवारी झालेल्या मॅचमध्ये भारतीय क्रिकेट टीमनं अफगाणिस्तानचा (India vs Afghanistan) 66 रननं पराभव केला. या विजयासह भारताने टी20 वर्ल्ड कपमध्ये त्यांचे विजयाचे खाते उघडले. त्यामुळे टीम इंडियाचा सर्वत्र बोलबाल सुरु आहे. अशातच, सामन्यादरम्यान हार्दिक आणि शहजादमध्ये झालेल्या जोरदार (hardik pandya and mohammad shahzad clashed icc share a funny video) धडकेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारताच्या डावाच्या १९ व्या षटकादरम्यान एक मजेशीर घटना घडली असल्याचे पाहायला मिळाले. भारताच्या डावाच्या १९ व्या षटकात अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक गोलंदाजी आला होता. त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटवर नीट बसला नाही. चेंडू बॅटवर व्यवस्थित आला नसल्यामुळे तो हवेत उडाला आणि नजीबच्या दिशेने गेला. नजीब मात्र, हा झेल घेऊ शकला नाही.
नजीबने हा झेल सोडल्याचे पाहून हार्दिक पांड्या दुसरी धाव घेण्यासाठी धावला. स्ट्राइकवर वेळेवर पोहोचण्याच्या नादात तो अफगाणिस्तानचा वजनदार यष्टीरक्षक मोहम्मद शहजादला जाऊन धडकला. दोघांमध्ये जोरदार टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले. दोघांमध्ये धडक झाल्यानंतर दोघेही वेगवेगळ्या बाजूला जाऊन पडले.
View this post on Instagram
या धडकीनंतर शहजाद नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. त्याने त्याच्या हातातील ग्लोव्जही काढून फेकलेले पाहायला मिळाले. आयसीसीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि चाहत्यांमध्ये हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hardik pandya, T20 league, T20 world cup