T20 World Cup 2020 : टी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना

T20 World Cup 2020 : टी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना

आयसीसीच्या वतीनं सातव्या पुरुष टी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

  • Share this:

पर्थ, 16 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये यजमान इंग्लंडनं बाजी मारल्यानंतर आज आयसीसीच्या वतीनं सातव्या पुरुष T20 World Cup 2020चे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्यांदाचा हा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात खेळला जाणार आहे. पाच आठवडे चालणारी ही स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2020पर्यंत खेळली जाणार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गतविजेत्या श्रीलंका आणि बांगलादेश यांना कमी रॅंकिंगमुळं टी-20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-12 संघात स्थान मिळालेले नाही. त्यामुळं त्यांना 12 संघात स्थान मिळवण्यासाठी ग्रुप स्टेजमध्ये भाग घ्यावा लागणार आहे.

ICCच्या सुपर-12 संघांची घोषणा करण्यात आली आहे. यात पाकिस्तान, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. मात्र गतविजेते आणि तीन वेळा उपविजेत्याचा मान मिळालेल्या श्रीलंका आणि बांगलादेश यांनी साखळी सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

असे आहेत दोन ग्रुप

ग्रुप 1- पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, ग्रुप A विजेता, ग्रुप B उप-विजेता

ग्रुप 2- भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, ग्रुप A उप-विजेता, ग्रुप B विजेता

वाचा- फक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा

असे असतील भारताचे सामने

ऑक्टोबर 24-भारत vs दक्षिण अफ्रीका (पर्थ स्टेडियम)

ऑक्टोबर 29- भारत vs क्वालिफायर ए-2 (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)

नोव्हेंबर 1- भारत vs इंग्लंड (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)

नोव्हेंबर 5 - भारत vs क्वालिफायर बी-1 (एडिलेड ओव्हल)

नोव्हेंबर 8- भारत vs अफगाणिस्तान (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)

सेमीफायनल

नोव्हेंबर 11 – पहिली सेमीफायनल (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)

नोव्हेंबर 12 – दुसरी सेमीफाइनल (एडिलेड ओव्हल)

फायनल

नोव्हेंबर 15 – फायनल (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)

वाचा- विराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...

इमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू, चिमुरड्याला ढिगाऱ्याबाहेर काढतानाचा LIVE VIDEO

First published: July 16, 2019, 4:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading