क्रिकेट खेळण्यासाठी व्हावं लागलं होतं 'मुलगा', आता 15व्या वर्षी भारताकडून खेळणार वर्ल्ड कप

क्रिकेट खेळण्यासाठी व्हावं लागलं होतं 'मुलगा', आता 15व्या वर्षी भारताकडून खेळणार वर्ल्ड कप

21 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान ऑस्ट्रेलियात महिला टी -20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जानेवारी: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयच्या वतीनं महिला संघ घोषित करण्यात आला आहे. 21 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान ऑस्ट्रेलियात महिला टी -20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. दरम्यान या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. भारतीय वर्ल्ड कप संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे देण्यात आले आहे. तर, स्मृती मांधनाला उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. मात्र यात सर्वांचे लक्ष वेधले ते 15 वर्षांच्या शेफाली वर्मानं.

शेफालींनं गेल्या वर्षीच भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात पदार्पण केले होते. क्रिकेटमध्ये पदार्पण करताच शेफालीनं सचिन तेंडुलकरचा 30 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला होता. शेफालीनं 15 वर्ष 285 दिवसांत अर्धशतकी कामगिरी केली होती. शेफालीने आतापर्यंत 9 आंतरराष्ट्रीय टी -20 सामने खेळले आहेत. यात तिनं तब्बल. 142.30 च्या स्ट्राइक रेटने 222 धावा केल्या. ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 73 होती.

वाचा-टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 वर्षांच्या युवा खेळाडूला दिली संधी

क्रिकेट खेळण्यासाठी व्हावं लागलं होतं 'मुलगा'

मुलगी असल्यानं हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील सर्व क्रिकेट अकॅडमीमध्ये तिला प्रवेश नाकारण्यात आला होता. पण क्रिकेट खेळायचंच हे स्वप्न उराशी बाळगलेल्या शेफालीने मुलग्यासारखी वेशभुषा करून प्रशिक्षण घेतलं असं तिच्या वडिलांनी सांगितलं. शेफालीच्या वडिलांनी सांगितलं की, मुलींसाठी रोहतकमध्ये एकही अकॅडमी नव्हती. त्यावेळी तिला प्रवेश मिळावा म्हणून भिक मागितली तरीही कोणी ऐकलं नाही.

वाचा-नववर्षात केएल राहुलचा दबदबा, रॅकिंगमध्ये कॅप्टन कोहलीला टाकले मागे

मुलगा होऊन केला सराव

शेफालीला शेवटी मुलीचे केस कापून तिला एका अकॅडमीत घेऊन गेलो आणि मुलाप्रमाणे प्रवेश घेतला. मुलांच्या संघातून खेळताना अनेकदा दुखापत झाली. तरीही न डगमगता तिने क्रिकेट खेळणं सुरू ठेवलं. तिच्या वडिलांनी सांगितलं की, मुलांविरुद्ध खेळणं सोप्पं नव्हतं. अनेकदा चेंडू हेल्मेटवर लागायचा. पण शेफालीने धैर्यानं सामना केला. एखादी मुलगी मुलगा होऊन खेळते तेव्हा तिला कोणीच कसं ओळखलं नाही असं विचारल्यानंतर शेफालीच्या वडिलांनी सांगितलं की, मला भिती होती पण कोणीही तिला ओळखलं नाही. वयच असं होतं की मुलगा मुलगी कळत नव्हतं.

वाचा-VIDEO : स्टार क्रिकेटपटूच्या ‘बालिश’ शॉटने दर्शकांना केले हैराण

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ- स्मृति मांधना (उप कर्णधार), हरमनप्रीत कौर (कप्तान), शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, वेदा कृष्णमूर्ति, रिचा घोष, तान्या भाटिया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड़, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर आणि अरूणधती रॉय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2020 07:59 AM IST

ताज्या बातम्या