मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 टीमची कॅप्टन्सी जाताच विराटला बसला सगळ्यात मोठा धक्का, 18 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच...

T20 टीमची कॅप्टन्सी जाताच विराटला बसला सगळ्यात मोठा धक्का, 18 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच...

टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) विराट कोहलीने (Virat Kohli) टीम इंडियाची कॅप्टन्सी सोडली, यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्येही विराट कोहलीला आराम देण्यात आला. यानंतर आता विराट कोहलीला आणखी एक धक्का बसला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 24 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) विराट कोहलीने (Virat Kohli) टीम इंडियाची कॅप्टन्सी सोडली, यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्येही विराट कोहलीला आराम देण्यात आला. यानंतर आता विराट कोहलीला आणखी एक धक्का बसला आहे. 18 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच विराट आयसीसी टी-20 क्रमवारीमध्ये (ICC T20 Ranking) टॉप-10 च्या बाहेर फेकला गेला आहे. टी-20 क्रमवारीत विराट आठव्या क्रमांकावरून 11 व्या क्रमांकावर गेला आहे. विराटच्या खात्यात 657 रेटिंग पॉईंट्स आहेत. दुसरीकडे केएल राहुलला एका स्थानाचा फायदा झाला आहे, त्यामुळे तो पाचव्या क्रमांकावर आला आहे. मागच्या 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी 4 सामन्यात केएल राहुलने अर्धशतकं केली. सूर्यकुमार यादवला 24 स्थानांचा फायदा झाल्यामुळे तो 59 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये संघर्ष करताना दिसला, पण तरीही तो 809 रेटिंग पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. पाकिस्तानचा विकेट कीपर बॅट्समन मोहम्मद रिझवान एक स्थान वरती चौथ्या क्रमांकावर आला आहे. रिझवानने बांगलादेशविरुद्धच्या 3 टी-20 मॅच्या सीरिजमध्ये 90 रन केले होते. या सीरिजमध्ये पाकिस्तानचा 3-0 ने विजय झाला होता. केएल राहुल रिझवानपेक्षा 6 रेटिंग पॉईंट्स मागे आहे. राहुलने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये 80 रन केले होते. तिसऱ्या मॅचमध्ये राहुल खेळला नव्हता. भारताने ही सीरिज 3-0 ने जिंकली होती.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये रोहित शर्माही चांगला खेळला होता. 3 मॅचमध्ये त्याने 53 च्या सरासरीने आणि 154 च्या स्ट्राईक रेटने 159 रन केले. रोहितने 3 पैकी 2 सामन्यांमध्ये अर्धशतकं केली, ज्यामुळे त्याला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं.

न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलनेही या सीरिजमध्ये 152 रन केले, ज्यामुळे त्याला 3 स्थानांचा फायदा झाला. गप्टील आता 10 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. बॉलर्सच्या यादीत भारताविरुद्ध 4 विकेट घेणारा मिचेल सॅन्टनर 23 व्या क्रमांकावरून 13 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर भुवनेश्वर कुमारला 5 स्थानांचा फायदा झाल्यामुळे तो 19 व्या क्रमांकावर आला आहे. दीपक चहरला 19 स्थानांचा फायदा झाला, ज्यामुळे तो आता 40 व्या क्रमांकावर आहे.

First published:

Tags: T20 cricket, Virat kohli