ICC T20 Ranking : केएल राहुलची चांदी, रॅकिंगमध्ये रोहित-विराटपेक्षा ठरला सरस!

ICC T20 Ranking : केएल राहुलची चांदी, रॅकिंगमध्ये रोहित-विराटपेक्षा ठरला सरस!

टी-20 मालिकेनंतर आयसीसीनं जारी केलेल्या रॅकिंगमध्ये केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिका विराटसेनेनं जबरदस्त कामगिरी करत खिशात घातली. भारतानं ही मालिका 2-1नं जिंकली. तिसऱ्या सामन्यात रोहित, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी शानदार फलंदाजी करत विंडिजला 240 धावांचे आव्हान दिले. यात केएल राहुलनं 56 चेंडूत 91 धावांची खेळी केली, आणि याचा फायदा केएल राहुलला झाला.

टी-20 मालिकेनंतर आयसीसीनं जारी केलेल्या रॅकिंगमध्ये केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. दोन महिन्यांनंतर विराट कोहलीनं पुन्हा एकदा टी-20 रॅकिंगमध्ये पहिल्या 10मध्ये स्थान मिळवले आहे. वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या तीन टी-20 सामन्यात विराटनं पहिल्या सामन्यात 94 धावा, दुसऱ्या सामन्यात 19 धावा आणि तिसऱ्या सामन्यात नाबाद 70 धावांची तुफान खेळी केली. या खेळीचा फायदा विराटला झाला, त्यानं आयसीसी टी-20 रॅकिंगमध्ये 5 स्थानाची झेप घेत 10व्या क्रमांकावर उडी घेतली.

वाचा-IPL 2020 लिलावाआधीच 639 खेळाडूंचा पत्ता कट! 'हा' खेळाडू ठरणार महागडा

या टी-20 मालिकेआधी विराट 15व्या स्थानावर होता. मात्र आता विराट टॉप-10मध्ये आला आहे. मात्र या सगळ्यात फायदा झाला तो केएल राहुलला. शिखर धवन बाहेर टी-20 मालिकेतून बाहेर पडल्यानंतर रोहित शर्मासोबत केएल राहुल सलामीसाठी उतरला. याचा फायदा घेत आता केएल राहुल आयसीसी रॅकिंगमध्ये 6व्या स्थानावर पोहचला आहे. तर, रोहित शर्मा 9व्या स्थानावर आणि कोहली 10व्या स्थानावर आहे.

वाचा-विराट कोहलीसाठी आनंदाची बातमी! दोन महिन्यांनंतर फिट झाला स्टार खेळाडू

वाचा-‘विराट तुने क्या किया?’, ऋषभ पंतमुळे सोशल मीडियावर कोहली झाला ट्रोल

विराट कोहलीचा दबदबा

आयसीसी कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेला विराट कोहली आता टी -20 क्रमवारीतही अव्वल दहामध्ये आला आहे. सध्या जगातील फक्त विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे, ज्यांच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी -20 क्रमवारीत पहिल्या दहामध्ये स्थान आहे. त्याच वेळी, रोहित शर्मा या प्रकरणात पिछाडीवर आहे, कारण तो कसोटीतील पहिल्या दहा स्थानांतून बाद झाला आहे. मात्र, तो वनडे आणि टी -20 मध्ये पहिल्या दहामध्ये कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2019 02:51 PM IST

ताज्या बातम्या