टीम इंडिया पडली उघडी; ICC रँकिंग पाहून तुम्ही सांगा टी-20 वर्ल्ड कप जिंकणार तरी कसा?

टीम इंडिया पडली उघडी; ICC रँकिंग पाहून तुम्ही सांगा टी-20 वर्ल्ड कप जिंकणार तरी कसा?

टी-20 वर्ल्ड कपसाठी आता 10-11 महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना भारताला मोठा फटका बसला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपसाठी आता 10-11 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. यासाठी सर्वच संघ जय्यत तयारी करत आहेत. असे असले तरी आयसीसीनं जाहीर केलेल्या टी-20 रॅंकिंगची यादी भारताची चिंता वाढवणारी आहे. वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेनंतर आयसीसीनं टी-20 रॅकिंग जाहीर केली. यात भारतीय गोलंदाजांची स्थिती चिंताजनक आहे.

आयसीसीच्या रॅकिंगमध्ये पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमचा दबदबा कायम आहे. पाकिस्तान संघ पहिल्या क्रमांकावर असून बाबर फलंदाजीमध्येही अव्वल आहे. तर, भारतीय फलंदाज रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना झटका बसला आहे. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या तिन्ही संघांना टी-20 मालिकेत नमवल्यानंतरही भारतीय संघाला विशेष फायदा झालेला नाही. भारतानं आतापर्यंत सर्व टी-20 मालिका जिंकल्या आहेत, असे असले तरी टी-20 रॅकिंगमध्ये एकाही फलंदाजाला किंवा गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.

वाचा-सोशल मीडियावरची पोस्ट पडली महागात, एका फोटोनं संपवलं क्रिकेटपटूचं करिअर

वाचा-वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीमुळं शतक हुकलं; गंभीरचा खळबळजनक आरोप

भारतीय संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष द्यायचे झाल्यास, रोहित शर्मा आणि केएल राहुल वगळता एकाही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. सध्या रोहित शर्मा सातव्या स्थानावरून आठव्या स्थानी आला आहे. तर लोकेश राहुल 8व्या स्थानावरून 9व्या स्थानावर आहे. एवढेच नाही तर यात शिखर धवन 14व्या तर विराट कोहली 15व्या स्थानी आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयसीसी रॅकिंगमध्ये एकही भारतीय गोलंदाज टॉप-10मध्ये नाही आहे. तर, ऑलराऊंडरच्या लिस्टमध्ये एकही खेळाडू टॉप 45मध्ये नाही आहे. त्यामुळं येत्या काळात भारतीय संघाला संघ म्हणून चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

वाचा-अर्धशतकानंतर पंचांनी दिला चुकीचा निर्णय, बाद होताच मराठमोळ्या क्रिकेटरचा मृत्यू

टी-20मध्ये भारताची अदोगती

कसोटीमध्ये भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर अधिराज्य गाजवत आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र टी-20 रॅकिंगमध्ये भारतीय संघ 260 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. भारतीय संघानं गेल्या बांगलादेश विरोधात मालिका जिंकली असली तरी, भारताला निर्विवादपणे विजय मिळवता आला नाही. दक्षिण आफ्रिका विरोधात भारतीय मालिका बरोबरीत सुटली होती. तर, बांगलादेश विरोधात पहिल्याच सामन्यात भारताला पराभवचा धक्का सहन करावा लागला होता. त्यामुळं वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारतीय संघाला वेस्ट इंडिज विरोधात आणि त्यानंतर न्यूझीलंड विरोधात चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: November 18, 2019, 6:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या