ICC T20 Ranking: नववर्षात केएल राहुलचा दबदबा, रॅकिंगमध्ये कॅप्टन कोहलीला टाकले मागे

ICC T20 Ranking: नववर्षात केएल राहुलचा दबदबा, रॅकिंगमध्ये कॅप्टन कोहलीला टाकले मागे

भारत-श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांची मालिका भारतानं 2-0ने जिंकली. त्यानंतर भारतीय फलंदाजांना आणि गोलंदाजांना आयसीसी रॅकिंगमध्ये फायदा झाला आहे.

  • Share this:

पुणे, 11 जानेवारी : भारत-श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांची मालिका भारतानं 2-0ने जिंकली. त्यानंतर भारतीय फलंदाजांना आणि गोलंदाजांना आयसीसी रॅकिंगमध्ये फायदा झाला आहे. आज जाहीर झालेल्या आयसीसी टी -20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने फलंदाजांच्या यादीत सहावे स्थान कायम राखले आहे, तर कर्णधार विराट कोहली एका स्थानाने पुढे होऊन नवव्या स्थानावर आहे.

या मालिकेत सलामीवीर राहुलने दोन डावांमध्ये 45 आणि 54 धावांची खेळी केली. त्यामुळं त्याला 26 गुणांचा फायदा झाला. राहुल सध्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलपेक्षा अवघ्या सहा गुणांनी मागे आहे. कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अव्वल फलंदाज कोहली टी-20मध्ये नवव्या स्थानावर आहे तर डावखुरा सलामीवीर शिखर धवनदेखील एका स्थानाचा फायदा झाला आहे. शिखर सध्या 15व्या स्थानावर आहे. तर, मनीष पांडेलाही चार स्थानांचा फायदा झाला आहे. मनीष पांडे 70व्या स्थानावर आहे.

वाचा-8 चेंडूत 22 धावांची झंझावाती खेळी! शार्दुलने सांगितले आक्रमक फलंदाजीचे सिक्रेट

वाचा-सेहवागने राहुल द्रविडची मिक्सरशी केली तुलना, मजेशीर ट्वीटची सगळीकडे चर्चा

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत नववर्षात झालेल्या अपडेटमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांना मोठा फायदा झाला आहे. यामुळं यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी त्यांना फायदा होईल. मालिकावीर पुरस्कार मिळवणाऱ्या नवदीप सैनीने 146 स्थानांची झेप घेत 98व्या क्रमांकावर पोहचला आहे. शार्दुल ठाकूरने पुन्हा क्रमवारीत 92व्या स्थानावर आहे. या दोन्ही गोलंदाजांनी पाच-पाच विकेट घेतल्या आहेत.

वाचा-जागा एक फलंदाज तीन! टीम इंडियातील भांडणामुळे भडकला कॅप्टन कोहली

तर जसप्रीत बुमराहला आठ स्थानांचा फायदा झाला आहे. बुमराह आता 39व्या स्थानावर आहे. तर, आयसीसी टीम रॅकिंगमध्ये भारताला दोन गुणांचा फायदा झाला आहे. मात्र संघ 260 अंकांनी पाचव्या स्थानावर कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jan 11, 2020 04:58 PM IST

ताज्या बातम्या