ICCनं घेतली तीन गोलंदाजांची विकेट, झाली निलंबनाची कारवाई

ICCनं घेतली तीन गोलंदाजांची विकेट, झाली निलंबनाची कारवाई

पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी सध्या पात्रता फेरी होत आहे.

  • Share this:

दुबई, 25 ऑक्टोबर : पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी सध्या पात्रता फेरी होत आहे. अबु धाबी येथे आयसीसी रॅकिंगमध्ये नसलेल्या संघांमध्ये ही पात्रता फेरी होत आहे. या पात्रता फेरीतून दोन संघ वर्ल्ड कपसाठी निवडले जातील. दरम्यान या सामन्यांमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. तीन गोलंदाजांना त्यांच्या अॅक्शनमुळं निलंबित करण्यात आले आहे.

आयसीसीनं सिंगापूरच्या सेलाडोरे कुमार (Selladore Kumar), स्कॉटलॅंडचा टॉम सोले (Tom Sole) आणि नायजेरियाचा अबियोदुन अबिओये (Abiodun Abioye) यांच्यावर संदिग्ध गोलंदाजी अॅक्शनमुळं (Suspect Bowling Action) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यापासून निलंबीत करण्यात आले आहे.

वाचा-Live सामन्यात मैदानाबाहेर धावत सुटला फलंदाज आणि उतरवली पॅंट, पाहा VIDEO

सध्या अबुदाबीमध्ये टी-20 क्वालिफायरमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यामुळं या गोलंदाजांवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. ICCनं यासंदर्भात एक निवेदन जारी करत याबाबत माहिती दिली. कुमारला 18 ऑक्टोबरला स्कॉटलॅंड विरोधात झालेल्या सामन्यात, सोलेल 19ला केनिया विरोधात आणि अबिओयेला 21 ऑक्टोबरला कॅनडा विरोधात झालेल्या सामन्यात ही कारवाई करण्यात आली. आयसीसीनं या तिन्ही गोलंदाजाच्या गोलंदाजीचे व्हिडीओ फुटेज पाहून हा निर्णय घेतला. सर्वातआधी आयसीसीच्य पॅनलनं कलम 6.7नुसार या गोलंदाजांवर बंदी घातली. दरम्यान जोपर्यंत या गोलंदाजांच्या गोलंदाजीमध्ये सुधार होणार नाही, तोपर्यंत ही बंदी उठवली जाणार नाही असे सांगण्यात आले आहे.

वाचा-याला म्हणतात बर्थ डे गिफ्ट! वाढदिवसादिवशीच भारतीय गोलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी

टी-20 क्वालिफायरमध्ये फलंदाजानं उतरवली होती पॅंट

कॅनडा आणि नायजेरिया यांच्यात झालेल्या सामन्यात एक अजब प्रकार घडला. या सामन्यात कॅनडानं 50 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यातल्या एक घटनेनं सर्वांनी हैराण केले. ही घटना एवढी मजेशीर होती की पंच, खेळाडू ते सर्व दर्शकांना हसू अनावर झाले. नायजेरिया संघाचा फलंदाज सुलेमान रुन्सेवे (Sulaimon Runsewe) अचानक मैदान सोडून पळत सुटला. ही घटना सामन्याच्या आठव्या ओव्हरमध्ये घडली. सुलेमान का धावत आहे, हे कोणालाच कळले नाही. बराच काळ तो मैदानात आला नाही म्हणून पंच स्वत: मैदानाबाहेर गेला. सुलेमानला पाहण्यासाठी कर्णधार एडेमोला ओनिकाई त्याला पाहण्यासाठी ला. मात्र त्यावेळी सुलेमान पॅंट घालत होता. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

वाचा-कौतुकासाठी शब्द कमी पडत होते, अशा लाडक्या खेळाडूचा शास्त्रींनी केला पत्ता कट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2019 05:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading