'ICC अजुनही न्यूझीलंडला विजेतेपद देऊ शकते', सायमन टफेल यांच्या 'त्या' प्रतिक्रियेनंतर जगभरातून सूर!

'ICC अजुनही न्यूझीलंडला विजेतेपद देऊ शकते', सायमन टफेल यांच्या 'त्या' प्रतिक्रियेनंतर जगभरातून सूर!

ICC Cricket World Cup इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाला अखेर चौकार-षटकारांच्या जोरावर यजमानांनी बाजी मारली.

  • Share this:

लॉर्ड्स, 16 जुलै : ICC Cricket Worldच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामना रोमांचक झाला. टाय झालेला सामना सुपर ओव्हरमध्ये गेला, मात्र सुपरओव्हरमध्येही हा सामना टाय झाला. अखेर जास्त चौकारांच्या जोरावर इंग्लडनं सामना जिंकला. दरम्यान, न्यूझीलंडकडे सुपर ओव्हर होण्याआधीच सामना जिंकण्याची संधी होती, मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये एका ओव्हरथ्रोनं सामन्याचे चित्र पालटले.

अंतिम सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये तीन चेंडूत इंग्लंडला 9 धावांची गरज होती. जेव्हा डीप मिडविकेटवरून गुप्टिलनं केलेला थ्रो, बेन स्टोकच्या बॅटला लागून बाऊंड्री बाहेर गेला. त्यानंतर पंच कुमार धर्मसेना यांनी दुसरे पंच इरासमुस यांच्याशी चर्चा करत, इंग्लंडला सहा धावा दिल्या. यात दोन धावा खेळाडूंनी धावत काढल्या तर, चार धावा ओव्हरथ्रोच्या मिळाल्या. या सहा धावांमुळं 242 धावांचा पाठलाग करणारा इंग्लंड 241 धावा करू शकला. त्यामुळं हा सामना टाय झाला.

माजी आंतरराष्ट्रीय पंच सायमन टफेल यांनीही वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पंचांकडून चुका झाल्याचं म्हटलं. तसेच ओव्हर थ्रोवर सहा धावा नाही तर पाच धावाच द्यायला हव्या होत्या असंही स्पष्ट केलं. टफेल यांच्या या वक्तव्यानंतर क्रिकेट प्रेमींनी आयसीसीनं पुन्हा विचार करावा आणि अजुनही वेळ गेलेली नाही असं म्हटलं आहे. आयसीसी न्यूझीलंडला संयुक्त विजेता घोषित करू शकते असंही चाहत्यांनी मत व्यक्त केलं आहे.

इएसपीएन या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ज्या थ्रोवर इंग्लंडनं सहा धावा केल्या तिथं केवळ पाच धावा देणे गरजेचे होते. खेळाच्या नियमानुसार इंग्लंडला एक धाव अधिक मिळाली, यामुळं सामन्याचे रूप पालटलं.

ओव्हर थ्रोसाठी आयसीसीनं दिलेल्या 19.8 नियमानुसार जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूमुळं जर चेंडू सीमापार गेला तर, त्याचा फायदा दुसऱ्या संघाला होतो. मात्र जर, फलंदाजानं थ्रो करण्याआधी धाव पूर्ण केली नसेल तर, एक अतिरिक्त धाव फलंदाजाला मिळत नाही.

नियमानुसार जेव्हा गुप्टिलनं थ्रो केला तेव्हा बेन स्टोक्स क्रिजमध्ये नव्हता. त्यामुळं दोन रन ऐवजी केवळ एक धाव देणे गरजेचे होते. त्यामुळं पंचाच्या एका चूकीमुळं न्यूझीलंडला वर्ल्ड कप गमवावा लागला.

icc cricket world cup england team celebrration

'टीम इंडियातील चौथ्या क्रमांकाची कमतरता मी भरून काढेन', कसोटी क्रिकेटपटूचा दावा!

target="_blank">पहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING!

फरसाण खाणाऱ्यांनी हा VIDEO नक्की पाहा; होत आहे तुमच्या जीवाशी खेळ

First published: July 16, 2019, 12:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading